जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे १०, अनु. जाती प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे २ उद्दिष्ट प्राप्त असून स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यासाठी ६ उद्दिष्ट देण्यात आले आहे. सदरिल प्राप्त उद्दिष्टानुसार मुख्यत्त्वे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के निधी, ब्रेंडींग व बाजारपेठ सुविधासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान निधी क्रेडीट लिंक्ड कॉपीटल सबसिडीच्या आधारावर अनुज्ञेय राहील. योजनेंतर्गत १० लाख रुपयेपर्यंतच्या प्रस्तावास राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने मंजूर केले जातील व रुपये १० लाखांपेक्षा जास्तीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जातील. स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीकरिता प्रतिबचत गट ४ लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत एफपीओ, एसएसजी, सहकारी संस्थांना सध्या कार्यरत उद्योगांस अर्थसहाय्य केले जाईल व अन्य कार्यरत उद्योग ज्यांची क्षमता आहे, अशा उद्योगांनाही सहाय्य केले जाईल. तसेच नवीन उद्योगांच्या बाबतीत जे उद्योग एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार हळद व हरभरा पिकावर आधारित आहेत. त्यासाठीच सहाय्य करण्यात येईल. तसेच एक जिल्हा एक उत्पादनाव्यतिरिक्त सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांना क्षमतावृद्धी, आधुनिकीकरण, विस्तार या बाबींसाठी या याेजनेचा लाभ घेता येईल. सदर उद्योग बँक कर्जाशी निगडित असून संस्थेची आर्थिक उलाढाल ही किमान रुपये १ कोटी असणे बंधनकारक आहे. प्रस्तावित प्रकल्पाची किंमत सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा जास्त नसावी, प्रकल्पधारक सभासदांना संबंधित उत्पादनाचा ३ वर्षांचा अनुभव असावा. सदर योजनेकरिता सद्यस्थितीत एफपीओ, एसएचजी, हसकारी संस्था यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी आर. के. क्षीरसागर व तंत्र सहाय्यक एस. आर. घुगे यांच्याशी संपर्क साधावाख असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST
जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे १०, अनु. जाती प्रवर्गासाठी वैयक्तिक उद्योगाचे २ उद्दिष्ट प्राप्त असून स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}