शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे प्रक्रिया करून ठेवण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

हिंगोली जिल्ह्यात जवळपास २.३५ लाख हेक्टरवर सोयाबीन घेतले जाते. यासाठी २ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. त्यामुळे ऐनवेळी बाजारपेठेत ...

हिंगोली जिल्ह्यात जवळपास २.३५ लाख हेक्टरवर सोयाबीन घेतले जाते. यासाठी २ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. त्यामुळे ऐनवेळी बाजारपेठेत शेतकरी बियाणांची शोधशोध करून हैराण होतात. त्यापेक्षा स्वत:कडील सोयाबीन बियाणे म्हणून वापरल्यास बियाणे खरेदीपासून सुटका होईल. कृषी विभागाने दिलेल्या विविध सूचना पाळून बियाणे साठवणूक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.

काय घ्यावी काळजी?

शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादन पीक प्रात्यक्षिके व शेतकरी समूह इत्यादी कार्यक्रमांतर्गतचे उत्पादित बियाणे तसेच स्वत: उत्पादित सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे. प्रमाणित बियाणांपासून उत्पादित चांगल्या प्रतिच्या बियाणांची चाळणी करून निवड करावी, सोयाबीन बियाणांचे बाह्य आवरण अत्यंत नाजूक व पातळ असल्याने त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे गरजेचे आहे. तर साठवणुकीपूर्वी दोन ते तीन दिवस उन्हात ताडपत्री अथवा सिमेंटच्या खळ्यावर अगदी पातळ पसरून वाळवावे. आर्द्रतेचे प्रमाण ९ ते १२ पर्यंत आणावे. यातील काडीकचरा, माती काढून स्वच्छ करावे व चांगल्या पोत्यात साठवून ठेवावे.

उगवणक्षमता तपासावी

सोयाबीण बियाणे साठवणूक करण्यापूर्वी घरगुती पद्धतीने त्याची उगवणक्षमता तपासावी व किमान ७० टक्के उगवण असेल तर बियाणे साठवणूक करावी. हे बियाणे आर्द्रता लवकर साठवून घेते त्यामुळे ओलविरहित व हवेशीर ठिकाणी साठवणूक करावी. प्लॅस्टिकऐवजी गोणपाटाच्या पोत्यात ठेवावे. पाचपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लावू नये, थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यावर करावी, पोत्यांची रचना आडव्या व उभ्या पद्धतीने करून हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार साठवणुकीच्या खोलीत कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. सोयाबीन वाहतूक करताना पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.