शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

रुग्णवाहिका न आल्याने मातेने ऑटोरिक्षात दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:51 AM

ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

ठळक मुद्देरुग्णवाहिका न आल्याने रिक्षातून दवाखान्यात जात होते माता व मुलगी दोघेही ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका  कॉल करूनही वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे गरोदर मातेस प्रसूतीसाठी आॅटोने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु रुग्णालयाच्या पायऱ्या चढण्याच्या आतच ऑटोमध्येच गरोदर मातेने कन्यारत्नास जन्म दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

औंढा नागनाथ तालुक्यातील धार येथील गरोदर मातेस घरी प्रसूती कळा सुरू झाल्या. यावेळी नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून येण्याची विनंती केली. परंतु बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी अखेर गावातील आॅटोने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गरोदर माता व नातेवाईक हे आॅटोने औंढा येथील रुग्णालयाकडे निघाले. आॅटो रूग्णालय परिसरात पोहोचताच मातेने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. यावेळी परिचारिका रुपाली रासेकर व रुख्मिणी क्षीरसागर यांनी धाव घेऊन तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर यांना बोलावून घेतले. गरोदर माता व बालकावर प्रथम आॅटोतच उपचार केले. त्यानंतर दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. माता व मुलगी दोघेही ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

रुग्णवाहिका नावालाचऔंढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शिरडहापूर, जवळा बाजार व औंढ्यासाठी ३ रुग्णवाहिका आहेत. यातील एक औंढ्यातील रुग्णवाहिका ही हिंगोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. औंढा हे तालुक्याचे ठिकाण असूनही रुग्णवाहिकेसाठी कॉल केल्यानंतर शिरडहापूर येथून रूग्णवाहिकेला औंढा येथे येण्यासाठी साधारणता ३० मिनिटे लागतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो. ...................... 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटलHingoliहिंगोली