हिंगोलीत मंगल कार्यालयावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST2021-02-26T04:42:55+5:302021-02-26T04:42:55+5:30

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी ...

Action on Mars office in Hingoli | हिंगोलीत मंगल कार्यालयावर कारवाई

हिंगोलीत मंगल कार्यालयावर कारवाई

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, शहरातील खटकाळी भागातील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभ आयोजित केल्याची माहिती नगरपालिकेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता नगरपालिका पथकातील पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, डी.पी. शिंदे, डी. बी. ठाकूर, एस. के. दोडल आदी कर्मचारी मंगल कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले.

दरम्यान, याप्रकरणी नगरपालिकेने ५० हजारांचा दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसेच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Action on Mars office in Hingoli