शासकीय रुग्णालयांमध्ये ५८ ऑक्सिजन बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:44+5:302021-05-09T04:30:44+5:30

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन वरील ११० तर विना ऑक्सिजनचे २० रुग्ण आहेत. तर ८ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. ...

58 oxygen beds vacant in government hospitals | शासकीय रुग्णालयांमध्ये ५८ ऑक्सिजन बेड रिकामे

शासकीय रुग्णालयांमध्ये ५८ ऑक्सिजन बेड रिकामे

Next

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन वरील ११० तर विना ऑक्सिजनचे २० रुग्ण आहेत. तर ८ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. बसस्थानकासमोरील नवीन हॉस्पिटलमध्ये ५५ ऑक्सिजन वरील तर २५ विना ऑक्सिजनचे रुग्ण दाखल आहेत. या ठिकाणी १० ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. कळमनुरी येथील रुग्णालयात विना ऑक्सिजनचे ४८ तर ऑक्सिजन वरील ६६ रुग्ण दाखल आहेत. या ठिकाणी ३४ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. वसमत येथील कोविड रुग्णालयात ९ विना ऑक्सिजनचे तर ४६ ऑक्सिजन वरील रुग्ण दाखल आहेत. येथे ४ बेड रिकामे आहेत. सिद्धेश्वरला १२ विना ऑक्सिजन तर २६ ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. तर २ रिकामे आहेत. कौठा येथे पूर्ण ३५ बेड भरलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन बेड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याशिवाय या ठिकाणी पहिल्या डोससाठी ३१ तर दुसऱ्या डोससाठी १२९ रेमडेसिविरची मागणी करण्यात आली होती.

खासगी रुग्णालयांमध्ये हिंगोलीत सहा रुग्णालये असून येथे ३२ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. उर्वरित सहा रुग्णालये वसमत येथील असून त्या ठिकाणी ४० ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये ही मोठ्या प्रमाणात बेड रिकामे होत असल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २८२ बेडची व्यवस्था आहे. यापैकी ७४ रुग्णांना विना ऑक्सिजनचे तर १०५ रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पहिल्या डोससाठी १६ रेमडेसिविर तर दुसऱ्या डोससाठी ८३ रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी शासकीय व खासगी अशा दोन्ही ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याची ओरड वाढली होती. सध्या ही ओरड थांबली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 58 oxygen beds vacant in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.