शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नवे ५४ रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २४ बाधित आढळले. यामध्ये अष्टविनायकनगर १, रिसाला बाजार १, खटकाळी १, मंगळवारा १, रेल्वे स्टेशन ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २४ बाधित आढळले. यामध्ये अष्टविनायकनगर १, रिसाला बाजार १, खटकाळी १, मंगळवारा १, रेल्वे स्टेशन रोड १, बेलदारपुरा १, नाईकनगर १, पलटण ३, शिवाजीनगर १, जामठी १, सरस्वतीनगर १, आनंदनगर १, एनटीसी १, पानकन्हेरगाव १, उमरा १, मंगळवारा १, भोसी, ता.औंढा १, जि.प. कार्यालय ३ यांचा समावेश आहे. सेनगाव परिसरात ९ बाधित आढळले असून यात सेनगाव ६, कहाकर १, सापडगाव १, जयपूर १ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात ४ बाधित आढळले असून यात पांगरा शिंदे ३, सिंदगी १ यांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या ७३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यात हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातून २५ जणांना घरी सोडले. तर लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधून २५जण घरी सोडले. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातून २१ व एक संदर्भित रुग्ण घरी सोडला. औंढा येथील कोरोना केअर सेंटरमधून बरा झालेला एक रुग्ण घरी सोडला.

आज कोरोनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात कळमनुरी येथील एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा तर हिंगोली येथील खुशालनगर भागातील एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४९७४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४४६७ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या ४३८ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ६९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दाखल असलेल्यांपैकी ३५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ८ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

जि.प.पुन्हा तीन विभाग ठप्प

जिल्हा परिषदेत यापूर्वी बांधकाम विभागात दोन रुग्ण आढळले होते. आता पंचायत, सामान्य प्रशासन व पाणीपुरवठा विभागात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने या विभागातील कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. मात्र सोमवारी स्वॅब घेतल्यानंतर बुधवारी अहवाल आले. तोपर्यंत हे कर्मचारी कार्यालयातच काम करीत होते. याची चर्चा जोरात रंगली होती.

स्वॅब घेताना नाकातून रक्त

आज अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने दिले. त्यातच एमपीएससीसाठीची रांगही दुपारनंतर सुरू झाली होती. मात्र सकाळी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वॅब घेताना योग्य काळजी न घेतल्याने हिंगोलीच्या मुख्याधिकाऱ्यांसह एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नाकातून रक्त आले. या बाबींकडे लक्ष देऊन आरोग्य विभागाने योग्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.