शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:31 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले.

ठळक मुद्देहिंगोली जिल्ह्यात दोन बहिणींचे लग्न तब्बल ५00 जणांची पळापळ सुरू

हिंगोली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असताना औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी दोन बहिणींच्या लग्नाला तब्बल ५०० वऱ्हाडींनी हजेरी लावली. शुभमंगल पार पडल्यानंतर जेवणाची तयारी सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांचा ताफा आणि पोलिसांना पाहून ५०० वऱ्हाडी ‘सावधान’ झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

याबाबत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, बोरजा येथील लग्न सोहळ्यात नियमापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास जबाबदार असणारे, सामाजिक अंतर न पाळणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू म्हणाले, ‘चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महसूलचे पथक घटनास्थळी गेले होते. पथकाच्या तक्रारीनंतर दोन्ही वऱ्हाडींवर गुन्हे दाखल करण्यात येतील.’

...अन् तब्बल ५00 जणांची पळापळ सुरूऔंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले. या लग्नासाठी दोन्ही मुलांकडील तब्बल ५00 वऱ्हाडी जमले. ही माहिती कोणीतरी जिल्हा प्रशासनाला कळविली. लग्न झाल्यानंतर जेवणाची तयारी सुरू असतानाच महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी धडकले. त्यामुळे  वऱ्हाडींची पळापळ सुरू झाली. सामाजिक अंतर, मास्क वापरण्याच्या सक्तीची ऐशीतैशी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोलीmarriageलग्न