शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

२० पेक्षा जास्त पटसंख्येअभावी ४ शाळा झाल्या समायोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये केलेल्या सर्व्हेनुसाार हिंगोलीत १६६ पैकी ९, सेनगावात १६७ पैकी १५, वसमतला १८९ पैकी ११, कळमनुरीत २०० ...

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये केलेल्या सर्व्हेनुसाार हिंगोलीत १६६ पैकी ९, सेनगावात १६७ पैकी १५, वसमतला १८९ पैकी ११, कळमनुरीत २०० पैकी २१ तर औंढ्यात १५७ पैकी १० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे आढळून आले होते.

शिक्षकांचे काय?

जर एखाद्या शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी असेल तर त्या शाळेतील शिक्षकांना इतर शाळेत समायोजित केले जाते. विद्यार्थीसंख्येनुसार ज्या शाळांना शिक्षकांची गरज आहे, तेथे या शिक्षकांना नियुक्ती दिली जाते. जर तरीही हे शिक्षक अतिरिक्त झाले तर मात्र प्रश्न निर्माण हाेतो. अशांबाबत वेळोवेळी आलेल्या शासन निर्देशांप्रमाणे निर्णय घेतला जातो.

विद्यार्थ्यांचे काय?

शिक्षण कायद्यानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य अथवा शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी सक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही नजीकच्या शाळेत समायोजित करण्याची व्यवस्था आहे का ते तपासूनच शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जातो. अशी पर्यायी व्यवस्था नसेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवून आहे तीच शाळा सुरू ठेवण्याशिवाय पर्याय राहात नाही.

या शाळा झाल्या समायोजित

२०१७ मध्ये जि.प.च्या ४ शाळा समायोजित झाल्या. यात जि.प. प्रा.शा. कन्या कळमनुरी, जि.प. प्रा.शा. कामठा, ता.औंढा, जि.प. प्रा.शा. वडद, ता.औंढा, जि.प. प्रा.शा. हनुमाननगर, ता.वसमत या शाळांचा समावेश आहे.

कोरोनामुळे यंदा कार्यवाही नाही

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्याचा आदेश असला तरीही त्यात अनेक बाबींकडे लक्ष ठेवावे लागते. नजीक मोठी शाळा असणे, तेथे ये-जा करणे सोयीस्कर असणे आदी बाबी तपासाव्या लागतात. यंदा कोरोनामुळे सर्वच शाळा बराच काळ बंद असल्याने यात कार्यवाही झाली नाही. मात्र २०१७ मध्ये ४ शाळा समायोजित केल्या होत्या.

-संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी, हिंगोली