शहरात १२ तर ग्रामीण भागात ५ कंटेनमेंट क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:27+5:302021-02-25T04:37:27+5:30

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शहरात १२ तर ग्रामीण ...

12 in the city and 5 in rural areas | शहरात १२ तर ग्रामीण भागात ५ कंटेनमेंट क्षेत्र घोषित

शहरात १२ तर ग्रामीण भागात ५ कंटेनमेंट क्षेत्र घोषित

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शहरात १२ तर ग्रामीण भागात ५ कंटेनमेंट घोषित केले आहेत.

शहरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनास आले आहेत. कोरोनाचा फैलाव इतरत्र होऊ नये म्हणून शहरातील १२ व ग्रामीण भागातील ५ ठिकाणी बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) चे कलम १८८ व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये लक्ष्मीनगर, बियाणीनगर, गांधी चौक, तालाब कट्टा, कोमटी गल्ली, मारवाडी गल्ली, ग्रामीण पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, विवेकानंद नगर, पोस्ट ऑफिस रोड, जिजामातानगर, टीव्ही सेंटर तर ग्रामीण भागातील समगा, सावरगाव बंगला, इंचा, काळकोंडी, जोडतळा या गावांचा समावेश आहे.

Web Title: 12 in the city and 5 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.