शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना जास्त प्रमाणात होणाऱ्या 'या' आजाराचे पुरुषांमध्येही प्रमाण वाढले, दुर्लक्ष केल्यास कायमचे पस्तावाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:42 IST

मूत्राशयाद्वारे आपल्या लघवीला प्रोस्टेट आणि लिंगाच्या आतड्यांपर्यंत घेऊन जाते. अशावेळी तुमच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यास इन्फेक्शन होते. साधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा प्रकार अधिक दिसतो.

आपल्या शरीरात अनेक भाग आहेत. ते त्यांचं कार्य करत असतात. त्यापैकीच एक यूरिनरी ट्रॅक्ट आहे. जे शरीरातील मूत्र बाहेर फेकण्याचं काम करतं. पुरुषांमध्ये किडनी जवळ हा भाग असतो. तिथेच मूत्राशय आणि यूरेथरा ही असते. त्यातूनच लघवीचं किडनीपासून ब्लॅडरपर्यंत वहन होतं.

युरेथ्रा ही एक सिंगल ट्यूब असते. मूत्राशयाद्वारे आपल्या लघवीला प्रोस्टेट आणि लिंगाच्या आतड्यांपर्यंत घेऊन जाते. अशावेळी तुमच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यास इन्फेक्शन होते. साधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा प्रकार अधिक दिसतो.

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रकार
डॉक्टर यूरनरी ट्रॅक्टला (UTI) दोन पद्धतीने पाहतात. पहिला अप्पर आणि दुसरा लोअर. जेव्हा तुमच्या वरच्या भागात इन्फेक्शन होतं. तेव्हा किडनी किंवा मूत्रपिंडाची समस्या उद्भवते. दुसरीकडे लोअर संक्रमण झाल्यास ते प्रोस्टेट आणि ब्लॅडरमध्ये होतं.

UTIचे लक्षण
तुम्हाला इन्फेक्शन कुठे झाले आहे यावरून यूरिनरील ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणं ठरतात. त्याची लक्षण या प्रकारे आहेत.

  • वारंवार लघवीला येणं
  • वारंवार लघवी आल्यासारखं वाटणं
  • लघवी केल्यानंतर वेदना होणं, जळजळ होणं, अस्वस्थ वाटणं
  • पोटाच्याखाली वेदना होणं
  • अंथरुणातच लघवी करणं
  • लघवीची दुर्गंधी येणं
  • लघवीवाटे रक्त जाणं
  • ताप येऊन घबराहट होणं
  • हात किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना होणं


यूटीआयचं निदान
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनतं निदान होण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतात. त्यानंतर यूरीन टेस्ट करून यूटीआयच्या समस्येचं निदान करतात. ही समस्या प्रोस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला एक्सरे किंवा अल्ट्रा साऊंडही करावी लागू शकते. त्यातून तुमचा यूरनरी ट्रॅक्ट डॉक्टरांना समजू शकतो.

अँटीबायोटिक औषधांची मदत
तुमच्या आरोग्याची माहिती घेऊन डॉक्टर तुमच्या उपचाराची प्रक्रिया सुरू करतात. यूटीआयसाठी सामान्यपणे लोकांना अँटीबायोटिक औषधे दिली जातात. कमीत कमी एक आठवडा आणि अधिकाधिक दोन आठवड्यासाठी ही औषधे घ्यावी लागतात. अनेकदा अँटीबायोटिक आयव्हीद्वारे दिली जातात. मात्र, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. अधिकाधिक लोकांना केवळ अँटिबायोटिक औषधांचं सेवनच करावं लागतं.

यूटीआयचं कारण
मूत्राशयातील यूटीआयची समस्या हा तारुण्यातील आजाराशी संबंधित आजार आहे. क्लैमायडिया आणि गोनोरिया हे आजार याचे मुख्य उदाहरण आहेत. तरुणांमध्ये ही समस्या सर्वाधिक असते. या शिवाय प्रोस्टेट ग्रंथीच्या काही समस्येमुळेही यूटीआयची समस्या निर्माण होते. एका ठरावीक वयानंतर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. वाढलेले प्रोस्टेट याला कारणीभूत ठरतात. 

किडनीपर्यंत इन्फेक्शन वाढू शकतं
वेळीच यूटीआयच्या समस्येवर उपचार घेतला नाही तर हा आजार किडनीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्यानंतर किडनीवर उपचार करावा लागतो. मात्र, अत्यंत कमी प्रकरणात ही समस्या दिसून येते. मात्र, अनेकदा या आजारामुळे किडनी खराबही होऊ शकते. किडनीची समस्या निर्माण झाल्यास रक्ताचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सेप्सिस होऊ शकतो. अशावेळी तुम्ही स्वत:ला आजारी समजू शकता. त्यामुळे वेळीच उपचार होणं आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स