आपण ऑफिस किंवा घरातील काही कामसाठी जाण्यासाठी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो. हे ट्रॅफिकच्या दृष्टीनेही बरं पडतं आणि पावसाळ्यात ड्रायव्हिंग रिस्कपासून बचावासाठीही हे चांगलं राहतं. मात्र, पावसाळ्यात पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये इन्फेक्शन होण्याची भीती अधिक असते. त्यात मुंबईच्या ट्रेनमध्ये तर ही भीती अधिकच असते. खोकला, सर्दी, वायरल सारख्या समस्या फारच सामान्य आहेत. ज्या एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतात. या समस्यांचा सामना करण्यासाठी काही खास टिप्स आम्ही देत आहोत.
आल्याची गोळी
आल्यापासून तयार करण्यात आलेली गोळी प्रवासात सोबत ठेवावी. ही गोळी प्रवासादरम्यान चघळत राहिलं पाहिजे. जर तुमच्या आजूबाजूला कुणी खोकला असलेली व्यक्ती बसली असेल आणि तुम्हालाही खोकला होऊ नये असं वाटत असेल तर हा उपाय बेस्ट आहे.
लवंग चघळा
जर तुम्हाला आल्याची गोळी खायची नसेल तर तुम्ही लवंग वापरू शकता. श्वासाच्या माध्यमातून पसरणारे आजार रोखण्यासाठी या चांगला उपाय आहे. काही तासांच्या प्रवासात तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांमुळे तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून लवंग सुरक्षित ठेवते.
त्वचेसंबंधी आजार
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्यावर हाताची स्वच्छ फार महत्वाची ठरते. कारण प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी हात लावल्यावर हातावर कीटाणू जमा झालेले असतात. ते दिसत नाहीत. अशात प्रवासात प्रयत्न करा की, हात मानेला, चेहऱ्याला आणि डोळ्यांना लावू नका. यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.
घरी जाऊन काढा किंवा काळ्या मिऱ्याचा चहा
मेट्रो, बस, ऑटो, ट्रेन किंवा कॅबमधून प्रवास करताना तुम्ही जर एखाद्या इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीजवळ बसले असाल तर घरी जाऊन काळ्या मिऱ्याचा चहा किंवा तुळशीचा काढा सेवन करा. जर हे काही घ्यायचं नसेल तर तुम्ही ब्लॅक टी सुद्धा घेऊ शकता.
हळदी-दूध
जर तुम्हाला दूध पिणं पसंत असेल तर तुम्ही घरी जाऊन लगेच हळद टाकून दूध सेवन करू शकता. खासकरून लहान मुलांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी हळद-दूध फायदेशीर ठरतं.