शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

'या' कारणांमुळे वाढते पोटाच्या आजूबाजूची चरबी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 12:12 PM

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटोच्या आजूबाजूला काही प्रमाणात चरबी असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण कंबरेच्या हाडांच्या रक्षणासाठी ती आवश्यक असते. पण पोटाच्या आजूबाला असलेली चरबी म्हणजेच, फॅट्स जर एका ठराविक मर्यादेपेक्षा वाढली तर अनेक गंभीर आजारही बळावू शकतात. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यांमुळे पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात. 

अनुवंशिकता 

काही लोकांच्या पोटावर चरबी जमा होण्याचं कारण हे अनुवंशिक असतं. जर त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडिलांपैकी कोणा एकाला जरी लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यामुळे त्यांच्या मुलांनाही ही समस्या होण्याची शक्यता वाढते. 

पचनक्रिया कमकुवत होणं

जर एकाद्या व्यक्तीला पचनक्रियेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीच्या पोटावर चरबी जमा होऊ लागते. पचनक्रिया कमकुवत असल्यामुळे त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पचनक्रिया कमकुवत असल्याने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा. थायरॉइड, डायबिटीस इत्यादी.

हार्मोन्समध्ये बदल 

चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांना वाढत्या वयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मोनोपॉज. ज्यामुळे महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. तसेच एंड्रोजनचं प्रमाण वाढू लागतं. ज्यामुळे कंबर आणि पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होऊ लागते. 

गरजेपेक्षा जास्त जेवण करणं

अनेक लोक काहीही काम नसल्यामुळे किंवा तणावामध्ये असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खातात. अनेकदा तर या व्यक्ती भूक नसतानाही उगाचच भरपेट खात राहतात. ज्यामुळे त्यांच्या पोटावरील चरबी वाढू लागते. 

दिवसभर फक्त बसून राहणं 

फक्त बसून राहिल्यानेही अनेक लोकांच्या पोटाजवळील चरबी वाढू लागते. बसल्या बसल्या फक्त मोबाईल, टिव्ही पाहत राहणं यामुळे शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी फार कमी होते. पोटावर वाढणाऱ्या चरबीमागील हेही एक मुख्य कारण आहे. 

तणावात राहणं 

जर एखादी व्यक्ती तणावात असेल तर पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढते, परिणामी लठ्ठपणाही वाढतो. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, कार्टिसोल. जेव्हा व्यक्ती तणावात असते त्यावेळी शरीरारील कार्टिसोलचं प्रमाण वाढतं. कार्टिसोल शरीरामधील फॅटचं प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतो. त्यामुळे कंबर आणि पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स