शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सहा पालिका रुग्णालयांत खासगी रक्तपेढ्यांना जागा; ३०० चौरस मीटर जागा दिल्याने वैद्यकीय वर्तुळात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:12 IST

राज्यातील बहुतांश रक्तपेढ्या गरजू रुग्णांना रक्ताच्या दरांत सवलत, थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त देण्याबाबत कोणताही उल्लेख प्रस्तावित करारात करण्यात आणलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या सहा रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे कामकाज  खासगी संस्थांकडून करण्याचा महापालिकेचा  प्रस्ताव वादात सापडला आहे. तीन विद्यमान आणि तीन नवीन रक्तपेढ्या खासगी सार्वजनिक तत्त्वावर (पीपीपी)  पद्धतीने चालविण्याचा निर्णय आहे. विशेष म्हणजे नवीन रक्तपेढी चालू करण्यासाठी १५० चौरस मीटर जागेची आवश्यकता असताना या रक्तपेढ्यांना ३०० चौरस मीटर जागा दिल्याने वैद्यकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

राज्यातील बहुतांश रक्तपेढ्या गरजू रुग्णांना रक्ताच्या दरांत सवलत, थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त देण्याबाबत कोणताही उल्लेख प्रस्तावित करारात करण्यात आणलेला नाही. तसेच रक्ताच्या चाचण्यांसाठी दराबाबत कोणतेही स्पष्टीकरण नसल्याचे दिसून येत आहे. पालिका  खासगी संस्थांना आवश्यकतेपेक्षा अधिक जागा देत आहे.

रक्त महाग होणारपीपीपी तत्वावर चालणाऱ्या  रक्तपेढ्यांना नॅट सारख्या अतिरिक्त चाचणी करण्याची परवानगी आहे. याचा खर्च रक्त पिशवीमधून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच रक्त महाग होण्याची शक्यता आहे.

निविदा प्रक्रियेला मुदतवाढवांद्रे भाभा, राजावाडी, कांदिवली शताब्दी या तीन रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्वावर आणि कुर्ला भाभा, एमटी अग्रवाल आणि भगवती या तीन रुग्णालयांमध्ये नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेला २७ ऑक्टोबरपर्यंत चौथ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 

सवलत देण्याचा कोणताही उल्लेख नाहीऑगस्ट महिन्यात महानगरपालिकेने  बांद्रा भाभा, घाटकोपर येथील राजावाडी आणि कांदिवलीतील शताब्दी या तीन रुग्णालयांसाठी तसेच कुर्ला भाभा, मुलुंड एम. टी. अग्रवाल आणि बोरिवली येथील भगवती या तीन नवीन रक्तपेढ्यांसाठी निविदा काढली होती. मात्र, निविदेत महापालिकेने रुग्णांना सवलत देण्याचा कोणताही उल्लेख नसल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गरीब रुग्ण वंचित राहू नये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत संपूर्ण रुग्णालये पीपीपी  पद्धतीने चालविण्याचे प्रयोग सुरू आहेत. मुंबईत मात्र महापालिकेने संपूर्ण रुग्णालये नव्हे, तर काही सेवा खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रक्रियेत गरीब रुग्ण वंचित राहू नयेत, अशी मागणी केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Hospitals to Outsource Blood Banks, Sparking Controversy Over Space Allotment

Web Summary : Mumbai's move to privatize blood banks in six hospitals faces scrutiny. Concerns arise over excessive space allocation to private entities, lack of concessions for needy patients, and potential price hikes for blood due to additional testing costs. The tender process has been extended.
टॅग्स :Blood Bankरक्तपेढी