घोरण्यामुळे वाढू शकतो अनेक गंभीर आजारांचा धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:36 IST2024-12-09T15:34:37+5:302024-12-09T15:36:51+5:30

Snoring May Leads To Disease: अनेकदा लोक घोरण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Snoring habits may leads to diabetes high bp blood pressure heart disease | घोरण्यामुळे वाढू शकतो अनेक गंभीर आजारांचा धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

घोरण्यामुळे वाढू शकतो अनेक गंभीर आजारांचा धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

Snoring May Leads To Disease: घोरणे ही एक अशी सवय आहे ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. अनेकदा लोक घोरण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. घोरण्याबाबत काही धक्कादायक गोष्टी रिसर्चमधून समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन ही सवय कशी दूर करता येईल याबाबत विचार केला पाहिजे. 

एम्स भोपाळच्या एक्सपर्ट्सनी ने यांनी 2019 ते 2023 पर्यंतच्या 18 ते 80 वयोगटातील 1,015 रूग्णांवर हा रिसर्च केला. यादरम्यान असं आढळून आलं की, स्नोरिंग म्हणजे घोरण्याच्या सवयीमुळे डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्या वाढू शकतात. रिसर्चमध्ये ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियाचा थेट संबंध हाय शुगर, हाय बीपी आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसोबत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला की, घोरण्याने लठ्ठपणासोबतच इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यात हार्ड डिजीज आणि ब्रेन स्ट्रोकचाही समावेश आहे. ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया (Obstructive sleep apnea) एक कॉमन डिजीज आहे. झोपेत श्वासनलिकेत अडथळा निर्माण होतो आणि शरीरात ऑक्सीजनची लेव्हलही कमी होते.  

एम्स भोपाळचे स्लीप एक्सपर्ट डॉ. अभिषेक गोयल यांनी सांगितलं की, या रिसर्चमधून गंभीर समस्या समोर आल्या. रिसर्चच्या आधारावर उपचारावर काम केलं जात आहे. जर लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता पसरवली गेली तर वेळीच उपचार मिळून समस्या दूर केली जाऊ शकते.

डॉ. सौरभ मित्तल यांनी सांगितलं की, ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियाची माहिती मिळवण्यासाठी एम्समध्ये टेस्ट केली जाते. एक वर्षात साधारण ६०० लोकांची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये साधारण ९० टक्के रूग्णांमध्ये गंभीर समस्या दिसून आल्या.

Web Title: Snoring habits may leads to diabetes high bp blood pressure heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.