जर तुम्ही महिनाभर तुमचे दात घासले नाही तर काय होईल? असे हाल होतील की आयुष्यभर पस्तावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:45 PM2021-10-01T17:45:33+5:302021-10-01T17:46:06+5:30

जर तुम्ही एक दिवस किंवा वर्षभर ब्रश करत नसाल किंवा कधीच ब्रश करत नसाल तर तुमच्या दातांचे काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहिती आहे का? किती वेळानंतर तुमचे दात पडायला लागतील. चला येथे जाणून घ्या.

side effects of not brushing teeth for month then for year | जर तुम्ही महिनाभर तुमचे दात घासले नाही तर काय होईल? असे हाल होतील की आयुष्यभर पस्तावाल

जर तुम्ही महिनाभर तुमचे दात घासले नाही तर काय होईल? असे हाल होतील की आयुष्यभर पस्तावाल

googlenewsNext

७०० वेगवेगळ्या प्रजातींमधील ६ दशलक्षाहून अधिक बॅक्टेरिया तुमच्या तोंडात राहतात. हे सर्व बॅक्टेरिया वाईट नाहीत, परंतु काही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. परंतु काही बॅक्टेरिया खूप धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकतात. म्हणूनच दात घासणे खूप महत्वाचे असते. जेणेकरुन धोकादायक बॅक्टेरिया टाळले जातील.

सकाळी दात घासणे केवळ तुमच्या तोंडासाठीच नव्हे तर तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. आपल्याला लहानपणी शिकवले जाते की, सकाळी उठल्यावर दात घासले पाहिजेत. पण जर तुम्ही एक दिवस किंवा वर्षभर ब्रश करत नसाल किंवा कधीच ब्रश करत नसाल तर तुमच्या दातांचे काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहिती आहे का? किती वेळानंतर तुमचे दात पडायला लागतील. चला येथे जाणून घ्या.

त्यामुळे तुमच्या तोंडातून आणि श्वासातून खूप दुर्गंधी येऊ लागते. ही एक अतिशय किरकोळ समस्या आहे, या व्यतिरिक्त, तुमच्या दातांमधील प्लाक जमतो आणि ते टार्टरचे रूप घेऊ लागतो. हा एक अतिशय कठीण थर असतो ज्यामुळे आपल्या दातांचा रंग देखील उडतो. यावेळी फक्त डॉक्टरच तुम्हाला ते काढून टाकण्यास मदत करु शकतात. या व्यतिरिक्त, तुमच्या दातांच्या वरच्या पृष्ठभाग म्हणजेच इनॅमल खराब होऊ लागेल. कारण तुमच्या तोंडातील जीवाणूंची संख्या सतत वाढत जाईल.

जर तुम्ही महिनाभर ब्रश केला नाही तर तुमच्या दात किडू लागतात. तुमच्या दातांमधील ही किड कालांतराने वाढत जाईल आणि अखेरीस तुमच्या दातांमध्ये पू भरेल आणि कालांतराने तुमच्या दातांची कॅव्हिटी आणखी खराब होईल. जिंजिव्हायटिसची समस्या तुमच्या तोंडात सुरु होईल. ज्यामुळे तुमच्या दातांभोवती हिरड्यांमध्ये जळजळ होईल आणि तुम्हाला काहीही खाण्यात त्रास होऊ लागेल. कारण, तुमचे हिरड्या खूप संवेदनशील झालेल्या असतील.

हे एक वर्षापर्यंत असंच सुरु राहील, त्यानंतर तुमचे दात पीरियोडॉन्टाइटिसच्या समस्येमध्ये बदलतील. हे तेव्हा घडते जेव्हा हिरड्यांची परत दातांपासून वेगळी होऊ लागते. अशी रिक्त जागा तयार केली जाते ज्यात अन्न आणि जीवाणू जमा होऊ लागतात. इतके बॅक्टेरिया असल्यास तुमच्या तोंडातील रोगांशी लढणारी यंत्रणा खराब होईल आणि जेव्हा तुमचे हिरडे मागे जायला लागतील, तेव्हा तुमचे दात पडू लागतील कारण ते सडलेले असतील आणि तोंडात कोणतेही दात नसल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागेल.

Web Title: side effects of not brushing teeth for month then for year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.