शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 12:55 IST

अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. यामुळे फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात.

अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. यामुळे फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात. यालाच आपण धाप लागणं असं म्हणतो. याकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. वारंवार होणारा हा त्रास दूर करण्यासाठी काही उपाय आहेत. शरीराला भासणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराला बाहेरून अतिरिक्त ऑक्सिजन देणं फायदेशीर ठरतं. 

महत्त्वाचं कारण

धाप लागण्याची साधरणतः दोन मुख्य कारणं सांगण्यात येतात. एक म्हणजे लठ्ठपणा आणि दुसरं म्हणजे शरीरात असलेली रक्ताची कमतरता. शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं मुख्य काम हे हिमोग्लोबिन करतं. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचीच कमतरता असेल तर मात्र शरीराला ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही. आपल्या देशामध्ये अनेक महिला कुपोषणाच्या शिकार आहेत. तसेच अनेक महिलांमध्ये गरोदरपणातील समस्या आणि त्यामध्ये होणारा अधिकाधिक रक्तस्त्राव यांमुळे रक्ताची कमतरता आढळून येते. देशात दोन मुलांच्या जन्मामधील अंतर कमी असणं हे देखील एनीमिया आणि धाप लागणं यांसारख्या आजारांच मुख्य कारण आहे. 

1. लठ्ठपणा ठरतोय शाप 

सध्या लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. नियमितपणे सकाळी चालणं आणि व्यायामाची कमतरता, व्यसनं करणं, अधिक फॅट्स असलेल्या पदार्थांचं भरपूर सेवन करणं यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाची शिकार होत आहेत. थोडीशी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते अशी समस्या अनेक लठ्ठ लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. वेळीच योग्य उपाय केल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते. 

2. फुफ्फुसांचे आजार उद्भवण्याचं मुख्य कारण

फुफ्फुसांमध्ये झालेलं इन्फेक्शन, निमोनिया आणि टीबी यांसारखे आजार धाप लागण्याची सर्वात प्रमुख कारणांपैकी एक आहेत. श्वसननलिकेला सूज येणं हे देखील धाप लागण्याचं कारण ठरू शकतं. याला वैद्यकिय भाषेमध्ये अस्थमॅटिक ब्राकाइटिस असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या अपघातामध्ये छातीला झालेल्या दुखापतीची नीट काळजी घेऊन योग्य ते उपचार घेतले नाही तर त्यामुळे फुफ्फुसांवर दबाव येतो. त्यामुळे धाप लागते. 

3. हृदयाचे विकार

एखादी व्यक्ती हृदय विकारांनी त्रस्त असेल तरीदेखील धाप लागण्याची समस्या उद्भवते. जर हृदय कमजोर असेल आणि मागच्यावेळी आलेल्या हार्ट अटॅकमुळे हृदयाचा एखादा भाग कमजोर झाला असेल तर त्यामुळे हृदय कमजोर होतं. जर एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच हृदयाशी निगडीत आजार आहेत तर शरीरामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होतं. अशावेळी शरीरावर निळसरपणा दिसून येतो. ओठ आणि हातांच्या बोटांवर याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे धाप लागते. 

आवश्यक तपासण्या

धाप लागण्याचा त्रास वारंवार होत असेल तर काही महत्त्वाच्या तपासण्या करून घेणं फायदेशीर ठरतं. छातीचा एक्स-रे काढणं, एचआर, सीटी स्कॅन, पीएफटी, हृदयासाठी डीएसई, रक्त तपासणी यांसारख्या तपासण्या करणं फायदेशीर ठरतं. 

धाप लागल्यावर काय कराल?

वारंवार धाप लागत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्याने आवश्यक त्या तपासण्या पूर्ण करा. त्यानंतर देण्यात आलेले सर्व औषधोपचार पूर्ण करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य