सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:52 PM2019-01-25T13:52:09+5:302019-01-25T13:58:43+5:30

क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे.

Monkey Fever is back, know Kyasanur Forest Disease KFD sign, treatment, prevention and Diagnosis | सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

googlenewsNext

क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. याला 'मंकी फीवर' (Monkey Fever) असंही म्हटलं जातं. केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये या गंभीर आजाराची लागण झालेला एक रूग्ण आढळून आला आहे. 36 वर्षाचा एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असून त्याची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दोनवर्षांपूर्वीदेखील या आजाराने थैमान घातले होते. 2013मध्ये या आजाराशी संबंधित पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर या धोकादायक व्हायरसने 2015मध्ये केरळमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळी या आजाराने ग्रस्त असलेले 102 रूग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 लोकांचा मृत्यू झाला होता. 2016मध्येही या आजाराने आपली हातपाय पसरले असून त्यावेळी 9 रूग्णांचा या आजाराची लागण झाली होती. 

क्यासानूर फॉरेस्ट डिझीज  Kyasanur Forest Disease नक्की आहे तरी काय?

'मंकी फीवर' एक संसर्गजन्य रोग असून एका घातक व्हायरसमुळे पसरणारा हा आजार आहे. याला वैद्यकिय भाषेमध्ये 'क्यासानूर फॉरेस्ट डिझीज' (Kyasanur Forest Disease) असं म्हटलं जातं. हा व्हायरस Flaviviridae नावाच्या एका गटातील आहे. 'केएफडी'च्या व्हायरसची ओळख 1957मध्ये झाली होती. त्यावेळी कर्नाटकमधील क्यासानूर जंगलामध्ये या आजाराने पीडित एक माकड भेटलं होत. प्रत्येक वर्षी 400 ते 500 लोकांना या रोगाची लागण होते. 

क्यासानूर फॉरेस्ट डिझीजची लक्षणं :

  • सर्दी होणं
  • थंडी वाजणं
  • ताप येणं
  • डोकेदुखी
  • स्नायूंच्या वेदना
  • सतत उलट्या होणं
  • पोटाच्या समस्या
  • शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणं

माणसांमध्ये कसा पसरतो मंकी फिवर?

हार्ड टिक्स (हेमाफिसॅलिस स्पिनिगेरा) हे या व्हारसचा भंडार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकदा जर याची लागण झाली तर संपूर्ण आयुष्यभरासाठी हा व्हायरस त्यांच्यामध्ये राहतो. या आजाराचे संक्रमण झालेल्या प्राण्यांनी चावल्यामुळे  KFDV व्हायरस अत्यंत वेगाने पसरतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या व्हायरसचा आजाराची लागण झालेल्या माणसांमुळे दुसऱ्या माणसामध्ये संसर्ग होत नाही. 

मंकी फिवरवर उपचार 

पीसीआर किंवा रक्तातून हा व्हायरस वेगळा करून सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराचे निदान केलं जाऊ शकतं. त्यानंतर एंजाइमशी निगडीत इम्युनोसोर्बेंट सेरोगेलिक परख (एलिसा)चा वापर करून सेरोग्लोबिकचे परिक्षण केलं जातं. केएफडीसाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. परंतु सुरुवातीच्या लक्षणांच्या आधारावर रूग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार करता येतात. 

'मंकी फीवर'पासून बचाव करण्यासाठी

केएफडीसाठी एक लस उपलब्ध असून त्याचा उपयोग भारतातील काही स्थानिक क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त असलेल्या उपायांमध्ये कीट रिपेलेंट्स आणि त्या क्षेत्रांमध्ये सुरक्षात्मक कपडे परिधान करणं आवश्यक आहे. 

Web Title: Monkey Fever is back, know Kyasanur Forest Disease KFD sign, treatment, prevention and Diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.