शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 09:00 IST

अल्झायमर केवळ अमायलॉइडमुळे होत नाही, तर सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या गळती किंवा अडथळ्यांमुळेही हानी वेगाने वाढते.

वॉशिंग्टन : रात्री उशिरा झोपल्याने किंवा असुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवसाची ऊर्जा तर कमी होतेच, पण दीर्घकाळ झोप न लागल्यामुळे (क्रॉनिक इन्सोम्निया) मेंदूत असे काही बदल घडतात की ज्यामुळे भविष्यात स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका निर्माण होतो, असे एका अमेरिकन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेतील मेयो क्लिनिक येथील संशोधकांनी ५० वर्षांवरील २,७५० व्यक्तींचा सरासरी साडेपाच वर्षे अभ्यास केला. दरवर्षी त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. अनेकांचा मेंदू स्कॅन करण्यात आला. या स्कॅनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींची नोंद झाली. एक मेंदूत साचणारे अमायलॉइड प्लॅक्स व दुसरे व्हाईट मॅटर हायपरइंटेन्सिटीस म्हणून ओळखली जाणारी सूक्ष्म हानी.

प्रतिबंधक उपाय लवकर सुरू करणे मेयो क्लिनिकच्या अभ्यासातील स्वयंसेवकांचे सरासरी वय सुरुवातीला ७० होते. पण इतर संशोधनांनी दाखविले आहे की, ५०व्या वर्षांमध्ये रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना पुढे डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. म्हणूनच, निवृत्तीची वाट पाहण्याऐवजी मध्यमवयापासूनच झोपेसह रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व व्यायामाकडे लक्ष देणे हे शहाणपणाचे ठरते.

दुहेरी धोका का जाणवतो?अल्झायमर केवळ अमायलॉइडमुळे होत नाही, तर सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या गळती किंवा अडथळ्यांमुळेही हानी वेगाने वाढते. अमायलॉइड न्युरॉन्सचे कार्य बिघडविते, तर व्हाईट मॅटर हानी मेंदूतील भागांमध्ये संदेशवहन विस्कळीत करते. त्यामुळे निद्रानाश असलेल्यांमध्ये दोन्ही एकत्र दिसल्यास धोका दुप्पट होतो.  झोप आणि मेंदू आरोग्याचा घनिष्ठ संबंध - संशोधकमध्यमवयीन काळात व त्यानंतरची झोप मेंदूच्या कार्यक्षमतेशी थेट निगडित आहे. निद्रानाशामुळे रक्तदाब व रक्तातील साखरही वाढण्याची शक्यता असते, असे युके, चीन आणि अमेरिका येथे झालेल्या इतर अभ्यासांत आढळले आहे. 

स्मरणशक्ती वेगाने ढासळली सामान्य झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत निद्रानाश असलेल्यांची स्मरणशक्ती व विचारशक्ती अधिक वेगाने घटली. या गटात डिमेन्शिया होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी जास्त होती. विशेष म्हणजे, कमी झोप घेणारे निद्रानाश ग्रस्त सुरुवातीपासूनच वयापेक्षा ४ ते ५ वर्षांनी वयस्क दिसतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स