उन्हाळ्यात खा 'या' फळाची भाजी, पचनसंस्था राहिल सुरळीत...इतरही भरपूर फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:30 PM2022-05-18T17:30:36+5:302022-05-18T17:32:42+5:30

पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फणस ही पोषक तत्वांनी समृद्ध हंगामी भाजी आहे, जी खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून (Ripe Jackfruit In Summer) दूर राहते.

jackfruit is extremely beneficial in summer | उन्हाळ्यात खा 'या' फळाची भाजी, पचनसंस्था राहिल सुरळीत...इतरही भरपूर फायदे

उन्हाळ्यात खा 'या' फळाची भाजी, पचनसंस्था राहिल सुरळीत...इतरही भरपूर फायदे

Next

उन्हाळ्यात फणस भरपूर प्रमाणात बाजारात येत असतात. फणसाचे गर खाण्यासोबतच त्याची भाजी आणि इतर पदार्थही बनवले जातात. वाढत्या उष्णतेमध्ये पिकलेला फणस खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असते. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फणस ही पोषक तत्वांनी समृद्ध हंगामी भाजी आहे, जी खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून (Ripe Jackfruit In Summer) दूर राहते.

वास्तविक, पिकलेल्या फणसात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त मुबलक प्रमाणात आढळतात, अशी माहिती EverydeHealth मध्ये दिली आहे. एवढेच नाही तर पिकलेल्या फणसात फायबरचे गुणधर्मही आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेल्या फणसात आढळणारे पोटॅशियम हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत करते आणि यकृत देखील निरोगी ठेवते. उन्हाळ्यात पिकलेले फणस का खावे ते जाणून घेऊया.

फणस खाण्याचे फायदे
पचन सुधारते -
उन्हाळ्यात ज्यांना पचन नीट होत नाही, अशा लोकांनी पिकलेला फणस नक्की खा. फणस अल्सर आणि पचनाच्या समस्या कमी करतो. यामुळे वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढते
पिकलेल्या फणसात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन-सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फणस फायदेशीर आहे.

हृदय निरोगी ठेवते -
पिकलेले फणस खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. पिकलेल्या फणसात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रण -
फणस हा रेझवेराट्रोल नावाच्या अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. पिकलेल्या फणसात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म लठ्ठपणा टाळण्यास मदत करतात. फणसाच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करता येते.

यकृत निरोगी -
पिकलेला फणस खाल्ल्याने यकृत निरोगी राहते. पिकलेल्या फणसात असलेले पोषक तत्व यकृताला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

फणसच नाही तर पानेही गुणकारी -
ज्यांना तोंडात वारंवार फोड येत असतात त्यांनी फणसाची पाने चावून थुंकावी. यामुळे अल्सरच्या समस्येत आराम मिळतो.

Web Title: jackfruit is extremely beneficial in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.