केस काळे करण्यासाठी डाय लावल्याने लिव्हर डॅमेजचा धोका? तज्ज्ञांचा सल्ला-डायच्या नादात आरोग्याचा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:30 IST2026-04-18T11:17:17+5:302026-04-18T15:30:50+5:30

Can Hair Dye Cause Liver Damage : सॅलूनमध्ये केसांचा रंग बदलताना अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हे केमिकल्स शरीरासाठी, खासकरून लिव्हरसाठी, नुकसानदायक आहेत का? पण याबाबतचं सत्य जरा वेगळं आहे.

Is there a risk of liver damage from using hair dye? See what experts say | केस काळे करण्यासाठी डाय लावल्याने लिव्हर डॅमेजचा धोका? तज्ज्ञांचा सल्ला-डायच्या नादात आरोग्याचा घोळ

केस काळे करण्यासाठी डाय लावल्याने लिव्हर डॅमेजचा धोका? तज्ज्ञांचा सल्ला-डायच्या नादात आरोग्याचा घोळ

Can Hair Dye Cause Liver Damage : कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली भरपूर वाढली आहे. चुकीचं खाणं-पिणं, चुकीची लाइफस्टाईल अशी याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मग काय पांढरे केस काळे करण्यासाठी जास्तीत जास्त लोक हेअर डायचा मार्ग निवडतात. पण सॅलूनमध्ये केसांचा रंग बदलताना अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हे केमिकल्स शरीरासाठी, खासकरून लिव्हरसाठी, नुकसानदायक आहेत का? पण याबाबतचं सत्य जरा वेगळं आहे.

एक्सपर्ट काय सांगतात?

सैफी हॉस्पिटलचे हेपॅटोलॉजिस्ट डॉ. चेतन कलाल यांनी TOI ला सांगितलं की, नियमितपणे कॉस्मेटिक हेअर डाय वापरल्याने सामान्य लोकांमध्ये लिव्हरला गंभीर नुकसान होतं, असा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. कारण बाजारात मिळणारे बहुतेक डाय नियंत्रित असतात आणि टाळूमधून त्यांचे शोषण खूप कमी प्रमाणात होते.

धोका नाही असं नाही

याचा अर्थ असा नाही की धोका अजिबात नाही. काही दुर्मिळ केसेसमध्ये पॅरा-फिनाइलिन डायमीनसारख्या केमिकल्समुळे लिव्हर डॅमेजची उदाहरणे आढळली आहेत. मात्र ही प्रकरणे खूपच कमी आणि व्यक्तीनुसार वेगवेगळी असतात.

कोणत्या परिस्थितीत धोका वाढतो?

डॉ. हर्षिल शाह यांच्या मते, टाळूवर जखम किंवा सूज असताना डाय वापरणे, डायचा वायू जास्त प्रमाणात श्वासातून जाणे, वारंवार आणि दीर्घकाळ वापर, आधीपासून काही आरोग्य समस्या असणे या स्थितींमध्ये धोका असतो. सामान्यतः यामुळे स्किन अॅलर्जी जास्त दिसते, जी त्रासदायक असते पण बहुतेक वेळा गंभीर नसते.

स्मोकिंगचा मोठा प्रभाव

लिव्हरच्या दृष्टीने स्मोकिंग हा मोठा धोका आहे. त्यामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस, सूज आणि लिव्हर डॅमेज वाढू शकते. त्यामुळे फक्त हेअर डायपेक्षा स्मोकिंग सोडणे अधिक महत्त्वाचे आहे.

सुरक्षित वापर कसा करावा?

नेहमी विश्वासार्ह आणि प्रमाणित ब्रँड वापरा

प्रत्येक वेळी पॅच टेस्ट करा

जखमी किंवा इन्फ्लेम्ड टाळूवर डाई लावू नका

“हर्बल” किंवा “अमोनिया-फ्री” म्हणजे पूर्णपणे सुरक्षित असेलच असे नाही

Web Title : क्या हेयर डाई से लिवर को नुकसान होता है? एक्सपर्ट्स की राय

Web Summary : एक्सपर्ट्स का कहना है कि हेयर डाई से लिवर को नुकसान होने की संभावना कम है। खोपड़ी पर चोट, अत्यधिक साँस लेने या पहले से मौजूद स्थितियों से खतरा बढ़ जाता है। धूम्रपान लिवर के लिए अधिक जोखिम भरा है। सुरक्षा के लिए विश्वसनीय ब्रांडों का उपयोग करें और पैच परीक्षण करें।

Web Title : Hair dye and liver damage: Experts reveal the truth.

Web Summary : Hair dye rarely causes liver damage, experts say. Risk increases with scalp injuries, excessive inhalation, or pre-existing conditions. Smoking poses a greater liver risk. Use trusted brands and perform patch tests for safety.