शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:07 IST

अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक आहे. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा मोठा धोका असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 

विविध सण, उत्सवाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्रावणात नागपंचमीनंतर एकामागून एक सण येतात. प्रत्येक घरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हा हमखास केला जातो. अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देतो. पण त्यातून येणारा धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एका रिसर्चमधून हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक आहे. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा मोठा धोका असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 

रिसर्चमध्ये सिगारेट आणि अगरबत्तीच्या धुरामुळे होणाऱ्या नुकसानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. याच दरम्यान अगरबत्तीच्या धुराच्या नमुन्यात ९९ टक्के अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म कण आढळले. या गोष्टी शरीराला नुकसान पोहोचवतात. साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चायना टोबॅको ग्वांगडोंग इंडस रेल्वे कंपनीने संयुक्तपणे हा रिसर्च केला आहे.

अगरबत्तीच्या धुरावर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार, अगरबत्ती जाळल्यानंतर धुरासोबत काही सूक्ष्म कण देखील बाहेर पडतात. हे कण हवेत मिसळतात. अगरबत्तींमधून बाहेर पडणाऱ्या विषारी कणांचा शरीराच्या पेशींवर अत्यंत वाईट परिणाम होतो.

कॅन्सरचा धोका

धुरामध्ये तीन प्रकारचे विशेष पदार्थ असतात ज्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. हे विषारी पदार्थ म्युटेजेनिक, जीनोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक म्हणून ओळखले जातात. अगरबत्तींमधून निघणारा धूर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये जळजळ, जळजळ आणि विविध प्रकारचे आजार होतात. अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनमार्गात जळजळ देखील होऊ शकते.

डोळ्यांसाठी घातक

अगरबत्तीच्या धुरात असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचेची ऍलर्जी यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या धुरामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका देखील असतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सSmokingधूम्रपान