रोगप्रतिकारकशक्ती कधीही वाढणार नाही; जर रोज करत असाल 'या' चुका, वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:33 PM2020-06-21T17:33:57+5:302020-06-21T17:49:21+5:30

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनापासून बचावासाठी लोक आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. 

Immunity is not increasing even after adopting every measure then avoid doing these 5 mistake | रोगप्रतिकारकशक्ती कधीही वाढणार नाही; जर रोज करत असाल 'या' चुका, वेळीच सावध व्हा

रोगप्रतिकारकशक्ती कधीही वाढणार नाही; जर रोज करत असाल 'या' चुका, वेळीच सावध व्हा

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. लस आणि औषधाचा शोध लागेपर्यंत लोकांना आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवून आजारांशी लढावं लागणार आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर व्हायरसच्या संक्रमणानंतर व्हायरसशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. या एंडीबॉडीजमुळे शरीरातील व्हायरसचा प्रभाव नष्ट होण्यास मदत होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोक आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. 

अनेकांना काही केल्या स्वतःचे आरोग्य चांगले ठेवता येत नाही. कितीही प्रयत्न केले तरी रोगप्रतिकारकशक्ती वाढत नाही. त्यामुळे त्यांना संक्रमण झाल्यास त्रासाचा सामना करावा लागतो. काही चुकांमुळे रोगप्रतिकारकशक्त वाढत नाही. आज आम्ही तुम्हाला याच  चुकांबाबत सांगणार आहोत. तुम्ही सुद्धा दैनंदिन जीवनात याच चुका केल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास अडथळा येऊ शकतो.

वेळेवर न झोपणं

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील एका अभ्यास दिसून आले की, पुरेशी झोप न घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. झोप व्यवस्थित न झाल्यास शरीरातील एंटिजन्स सुरळितरित्या काम करत नाहीत. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते.

व्हिटामीन्सची कमतरता

लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लोक आपापल्या घरी बसून आहेत. अशात शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भासत आहे. या कारणामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यावर उपाय म्हणून नेहमी घराबाहरे पडून किंवा बाल्कनीत डोकावून, बागेत बसून कोवळ्या उन्हापासून व्हिटामीन डी मिळवण्याचा प्रयत्न करावा.

खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष

कोरोनाकाळात काम, अभ्यास सगळ्याच गोष्टी घरात राहून केल्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे जेवणाच्या आणि नाष्त्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. कधीही मुड झाला तेव्हा लोक जेवतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

आळस

लॉकडाऊनमुळे अनेकांना जास्त आळस जास्त प्रमाणात यायला सुरूवात झाली आहे.  जीमला  जाणं किंवा घरी व्यायाम करणं याकडे फारसं लक्ष न दिल्यामुळे लोकांना रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने आजारांचा सामना करावा लागत आहे. म्हणून घरी असताना शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे. अन्यथा नकळतपणे लठ्ठपणाचे शिकार व्हावं लागू शकतं.

खुशखबर! एकमात्र कोरोनाची लस यावर्षीच यशस्वीरित्या तयार होणार, भारतात उत्पादनाला सुरूवात

चिंता वाढली! टॉयलेटसीट सुद्धा ठरू शकते कोरोना संसर्गाचं कारणं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
 

Web Title: Immunity is not increasing even after adopting every measure then avoid doing these 5 mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.