घरच्या घरी करा 'हे' उपाय आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:13 PM2021-05-07T18:13:39+5:302021-05-07T18:53:21+5:30

चेहऱ्यावरील अनावश्यक केसांचा वैताग आलाय? त्यात लॉकडाऊनमुळे ब्युटी पार्लर्सपण बंद. मग काय कराल? करा हे उपाय....

Home remedies get rid of unwanted facial hair | घरच्या घरी करा 'हे' उपाय आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवा.....

घरच्या घरी करा 'हे' उपाय आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवा.....

Next

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी तुम्ही कितीवेळा ब्युटीपार्लरच्या फेऱ्या मारता. बाजारातील किती प्रोडक्ट्सचा वापर करता. काहीवेळा हे घातक ठरू शकते. हे सगळं करताना पैसे वाया जातात ते वेगळे. मग कशाला इतका खटाटोप. आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे चेहऱ्यावरचे केसही कमी होतील आणि काही अपायही होणार नाही. महत्वाचं म्हणजे तुम्ही हे उपाय घरच्याघरी करू शकता.

ओट्स आणि केळे- हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी किती आरोग्यदायी आहेत हे तुम्हाला ठाऊक असेलच. पण आता याचा उपयोग तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठीही करू शकता. दोन मोठे चमचे ओटमील घ्या. ते मिक्सरमध्ये जाडसर वाटा. त्यात केळही थोडं जाडसर वाटून टाका. हा लेप व्यवस्थित चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे तसाच ठेवा. थंड पाण्याने धुवून टाका. ओटमील तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.  अशा पद्धतीने हा लेप तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. असे केल्यास चेहऱ्यावरील केस हळू हळू निघण्यास मदत होते. चेहरा चमकदार होतो.

साखर आणि लिंबाचा रस- दोन मोठे जमचे साखर आणि लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर एका भांड्यामध्ये गरम करा. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर वॅक्स करताना जसे चेहऱ्यावर वॅक्स लावतात तसे लावून घ्या. तुम्ही हे वॅक्स स्ट्रीपने पण काढू शकता आणि चेहऱ्यावर हाताने गोल गोल फिरवतही धूवू शकता. लिंबामुळे तुमची त्वचा ब्लीच होण्यासही मदत होते.

बटाटा आणि मसुरची डाळ- मसूरची डाळ तुम्हाला लागेल तितक्या अंदाजाप्रमाणे वाटून घ्या. त्यात बटाट्याचा रस ५ चमचे, २ चमचे लिंबाचा रस आणि १ मोठा चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवून घ्या. बटाटा हे नैसर्गिक ब्लीच आहे. तसंच त्यामुळे तुमच्या त्वचेलाही फायदा होतो. 

लिंबू आणि मध- दोन मोठे चमचे साखर घ्या त्यात मध मिसळा. हे मिश्रण गरम करा. त्यानंतर थोडं थंड करून यात कॉर्नस्टार्च मिसळा. हे मिश्रण वॅक्सचे मिश्रण असते तसे चेहऱ्यावर जिथे केस असतील तिथे लावा. वॅक्स स्ट्रीपने रिमूव्ह करा. बघा तुमचा चेहऱ्यावरचे केस निघून जातात आणि तुमचा चेहराही उजळतो.

 

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Home remedies get rid of unwanted facial hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app