शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

तुम्हालाही अपचनामुळे आंबट ढेकर येतात का? 'या' सोप्या घरगुती उपायांनी समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:44 PM

कारण नसताना कडवट, आंबट द्रवपदार्थ घशातून आल्यास खूप त्रास होतो.

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपापल्या घरी आहेत. घरी राहिल्यामुळे फारशी हालचाल होत नाही. पोट साफ न होणं, अपचन होणं, ढेकर येणं अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.ढेकर येणं ही खूपच सामन्य गोष्ट आहे.  जेवण झाल्यानंतर काही वेळाने सगळ्यांनाच ढेकर येतात. पण काहीही कारण नसताना कडवट, आंबट द्रवपदार्थ घशातून आल्यास खूप त्रास होतो. त्यामुळे घसा, पोट आणि छातीत जळजळ होते. आज आम्ही तुम्हाला कडवट ढेकर येण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय सांगणार आहोत. 

शारीरिक हालचालींमुळेही अनेकदा ढेकर येतात. निष्कारण ढेकर आल्यामुळे पोटात हवा जमा होते. सामान्य ढेकर येत असतील तर पचनक्रिया व्यवस्थित असते. रक्तप्रवाह वाढल्यामुळे़ त्याला वेग प्राप्त होतो. त्यामुळे पचनशक्ती खराब होते. अशा स्थितीत पोटात हवा जमा झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसंच पोटात जास्त प्रमाणात गॅस जमा होणं यांमुळे ढेकर येतात. ढेकर येताना एसिडीक द्रवपदार्थ घश्यात आल्यास आंबट येणं असं म्हणतात

कारणं

भूकेमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला भूक लागते. काहीतरी हलकं फुलकं खाण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जास्त हेवी खाल्लेत पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एकत्र जास्त खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात राहा. तीव्रतेने भूक लागल्यानंतर तुम्ही काही खाता तेव्हा  ५ ते १०  मिनिटांनंतर लगेच ढेकर येतो. म्हणून ढेकर आल्यानंतर ३० मिनिटं ब्रेक घेतल्यानंतर काहीही खायला हवं.

उपाय

सतत ढेकर  येत असल्यास वेलची घालून चहा प्यायल्यास समस्येपासून आराम मिळतो. 

पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून प्यायल्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते.

कोंथिबीरीची दांडी चावून खाल्यास ठेकर येणं थांबतं.

सोडा प्यायल्याने पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत मिळेल

लवंग किंवा आल्याचा तुकडा चोखल्याने ढेकर येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. 

थंड दूध प्यायल्यानेही ढेकर येणं थांबते. 

जास्त जास्त होत असल्यास  डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. 

शक्यतो जेवणाच्या वेळा चुकवू नका, रात्री उशीरा जेवणं टाळा.

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' सर्वात स्वस्त औषधालाही मिळाली परवानगी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य