शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 11:41 IST

Water Drinking Empty Stomach : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे असतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Water Drinking Empty Stomach :  पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण पाणी कधी आणि किती प्यावं हे जर तुम्हाला समजलं तर तुमचं आरोग्य कधीच बिघडणार नाही. अनेक एक्सपर्ट रोज सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला देतात. त्यामागे काहीतरी कारण असतं. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे असतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपलं शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावतं. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण 60-70 टक्के असतं. पाणी हे कोशिकांच्या माध्यामातून पोषक तत्व आणि ऑक्सीजन पोहोचवतं. यासोबतच पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास त्याचेही अनेक फायदे होते. 

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे

1) जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला हवं.

2) सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त स्वच्छ होतं. रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते. 

3) शरीराची स्वत:ची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करतात. सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते. 

4) जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार घेण्यास मदत मिळते. 

5) सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते. 

6) सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते. यासोबतच मांसपेशींमध्ये मजबूती येते. 

7) सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य