शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
3
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
4
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
5
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
6
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
7
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
8
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
9
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
10
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
11
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
12
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
13
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
14
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
15
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
16
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
17
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
18
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
19
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
20
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
Daily Top 2Weekly Top 5

आजारातून बरे झाल्यावरही हंटाव्हायरस पुरूषांच्या स्पर्ममध्ये ६ वर्ष जिवंत राहतो, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:31 IST

Hantavirus : वैज्ञानिकांचं असं मत आहे की, पुरूषांचे अंडकोष हंटाव्हायरससाठी एक सुरक्षित जागा बनतात. इथे इम्यून सिस्टीम सहजपणे पोहोचत नाही.

Hantavirus : हंटाव्हायरसने सध्या काही देशांमध्ये चांगलाच हैदोस घातलाय. काही लोकांचे जीव सुद्धा गेले आहेत. त्यामुळे सध्या या नव्या व्हायरसबाबत काही संशोधनं समोर येत आहेत. अलीकडे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, हंटाव्हायरस इन्फेक्शननंतरही तो पुरूषांच्या स्पर्ममध्ये तब्बल सहा वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधाच्या माध्यमातून इन्फेक्शन इतरांना होण्याचाही धोका राहतो.   

स्वित्झर्लॅंडच्या स्पीज लेबॉरेटरीकडून हे संशोधन करण्यात आलंय. वैज्ञानिकांनी ५५ वर्षीय स्विस पुरूषाची टेस्ट केली, तो सहा वर्षांआधी दक्षिण अमेरिकेत हंटाव्हायरस्या एंड्रीज स्टेनने संक्रमित झाला होता. त्याचं रक्त, लघवी आणि श्वसनलिकेत व्हायरस असल्याची कोणतीही खूण नव्हती. पण त्याच्या स्पर्ममध्ये ७१ महिन्यानंतरही म्हणजे तब्बल सहा वर्षानंतरही व्हायरस होता. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, पुरूषांचे अंडकोष व्हायरससाठी एक सुरक्षित जागा बनतात. इथे इम्यून सिस्टीम सहजपणे पोहोचत नाही. स्पर्म सेल्सना प्रजननासाठी सुरक्षा दिलेली असते. हेच कारण आहे की, व्हायरस इथे अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.    

इबोला आणि झिका व्हायरससारखी ही स्थिती आहे. म्हणजे हे व्हायरस सु्द्धा अंडकोषात लपून राहू शकतात. २०२१ मध्ये गिनीमध्ये इबोला व्हायरस काही प्रमाणात पसरला होता. २०१४-१६ मधील मोठ्या महामारीतून वाचलेल्या व्यक्तीच्या लैंगिक संबंधाद्वारे हा व्हायरस पसरला होता. या व्यक्तीच्या स्पर्ममध्ये इबोला व्हायरस अनेक वर्ष जिवंत होता.

हंटाव्हायरसची लागण कुणाला लैंगिक संबंधातून झाली अशी सध्यातरी एकही केस समोर आली नाही. पण संशोधन सांगतं की, एंडीज व्हायरसमध्ये ही शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे.  

अंडकोषात कसा जिवंत राहतो व्हायरस?  

पुरूषांच्या अंडकोषात स्पर्म तयार होतात. शरीराची रचना अशी असते की, इम्यून सिस्टीम स्पर्म सेल्सवर हल्ला करत नाही. कारण असं झालं तर प्रजनन क्षमता थांबेल. हीच सुरक्षा व्हायरसना सुद्धा मिळते. ते स्पर्ममध्ये लपून राहून अनेक वर्ष जिवंत राहू शकतात. जेव्हा कुणी शारीरिक संबंध ठेवतील तेव्हा व्हायरसची लागण इतरांना होऊ शकते.    

कसा पसरतो हंटाव्हायरस?

डॉक्टर सांगतात की, या इन्फेक्शनचा मुख्य सोर्स मनुष्य नाहीत, तर उंदीर आहेत. जेव्हा इन्फेक्शन झालेले उंदीर बंद जागेत किंवा कमी हवा असलेल्या जागेत जसे की, जुने शेड, स्टोर रूम किंवा टेंटमध्ये आपलं मलमूत्र किंवा लाळ सोडतात तेव्हा व्हायरस हवेच्या बारीक कणांमध्ये मिसळतो. जेव्हा एखादी व्यक्ती त्या जागेवर श्वास घेतो, तेव्हा त्याला याची लागण होतं.     

बचावाचे उपाय

- हंटाव्हायरसपासून सुरक्षित राहणं फार सोपं आहे. आपलं घर आणि किचनला उंदरांपासून दूर ठेवा.

- उंदरांची घाण स्वच्छ करण्यासाठी कोरडा झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करू नका, कारण यानी व्हायरस हवेत उडतो.

- नेहमीच हँड ग्लव्ह्स आणि मास्क वापरा. घाणीवर केमिकल स्प्रे करा आणि ओल्या कापडाने स्वच्छता करा. 

- व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर प्रोटेक्शनचा वापर करा

English
हिंदी सारांश
Web Title : Hantavirus can persist in sperm for six years: Research reveals.

Web Summary : Hantavirus can survive in men's sperm for up to six years post-infection, posing a transmission risk through sexual contact. Researchers advise caution and protection, highlighting the virus's ability to hide in testicles, similar to Ebola and Zika.
टॅग्स :Hantavirusहंटा व्हायरसHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन