शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Work from home tips: लॅपटॉपवर सतत तासन् तास बसून डोळ्यांचं आरोग्य येतंय धोक्यात, वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:45 IST

लॅपटॉप किंवा मोबाईलवर बराचवेळ बसुन राहील्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यात डोळ्यांमध्ये खाज, डोळे दुखणे, धुसर दिसणे अशा समस्या जाणवत आहेत. हे सर्व कशामुळे होते याची कारणे जाणून घेऊ. तसेच यावरील उपायही जाणून घेऊ...

सध्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे अनेक व्याधी जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात डोळ्यांचे आरोग्य तर अत्यंत धोक्यात आले आहे. डोळ्यांच्या समस्येने ग्रस्त अनेक लोक सध्या डॉक्टरांकडे जात आहे. अशा पेशंट्सच प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलवर बराचवेळ बसुन राहील्याने डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यात डोळ्यांमध्ये खाज, डोळे दुखणे, धुसर दिसणे अशा समस्या जाणवत आहेत. हे सर्व कशामुळे होते याची कारणे जाणून घेऊ. तसेच यावरील उपायही जाणून घेऊ...

डोळे कोरडे होणेअसं म्हणतात १ मिनिटात एखाद्या व्यक्तीच्या पापण्या १७ ते २० वेळा उघडझाप होतात. पापण्या मिटून उघडझाप झाल्याने डोळ्यात अश्रु येतात. या नैसर्गिक अश्रुंमुळे डोळ्यात थंडावा व ओलसरपणा राहतो जो डोळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आपण लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब किंवा मोबाईलवर तास्नतास बसून राहतो तेव्हा डोळ्यांची उघडझाप होत नाही. त्यामुळे डोळे कोरडे होतात. अशावेळी डोळ्यांना खाज येत राहते.

यावर उपाय काय?डोळ्यांच्या पापण्यांचा मसाज करातुम्ही हलक्या हाताने डोळ्यांच्या पापण्यांचा मसाज करु शकता. तसेच तोंडावर हात ठेवुन तोंडावरील गरम हवा हातात जमा करा. हे हात डोळ्यांवरुन फिरवा. याचा डोळ्यांतील आर्द्रता कायम राखण्यामध्ये फार फायदा होतो.

दर वीस मिनिटांनी ब्रेक घ्यातुम्ही लॅपटॉप अथवा कम्प्युटरवर काम करताना दर २० मिनिटांनी ब्रेक घेतला पाहिजे. त्या शिवाय मध्येमध्ये सारख्या पापण्या उघडझाप केल्या पाहिजेत. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येईल. डोळे थंड व ओलसर राहतील.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स