'ब्लू लाईट' चष्म्यांनी खरंच स्क्रीनपासून डोळ्यांचं रक्षण होतं का, हा फक्त ट्रेंड तर नाही ना? एक्सपर्टनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:25 IST2026-04-23T11:20:50+5:302026-04-23T11:25:46+5:30
Eye Care Tips : कंपनीवाले दावा करतात की, डोळ्यांचं नुकसान करणारा ब्लू लाइट या चष्म्यामुळे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. पण खरंच या चष्म्यांनी काही फायदा होतो का?

'ब्लू लाईट' चष्म्यांनी खरंच स्क्रीनपासून डोळ्यांचं रक्षण होतं का, हा फक्त ट्रेंड तर नाही ना? एक्सपर्टनी स्पष्टच सांगितलं
Eye Care Tips : हल्ली जास्तीत जास्त लोकांचा वेळ मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही किंवा टॅबलेट स्क्रीन बघण्यात जातो. पुरूष, महिला, लहान मुले, वृद्ध सगळ्यांचाच यात समावेश आहे. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे डोळे जळजळ होणे, थकवा जाणवणे कॉमन आहे. आता लोकांना स्क्रीनची इतकी सवय लागली आहे की, डोळ्यांची सुरक्षा करण्यासाठी ते 'ब्लू लाईट' रोखणारा चष्मा वापरू लागले आहेत. कंपनीवाले दावा करतात की, डोळ्यांचं नुकसान करणारा ब्लू लाईट या चष्म्यामुळे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. पण मूळ प्रश्न आहे की, खरंच हे चष्मे आपल्या डोळ्यांसाठी सुरक्षा कवचसारखे काम करतात का? पाहुयात यावर डॉक्टर काय सांगतात.
ब्लू लाईट काय असतो?
मीडिया रिपोर्टनुसार, ब्लू लाईट एकप्रकारचा हाय-एनर्जी प्रकाश असतो. हा प्रकाश केवळ डिजिटल स्क्रीनमधूनच नाही तर सूर्याच्या प्रकाशातूनही निघतो. जेव्हा आपण तासंतास स्क्रीन बघत असतो, तेव्हा डोळे कोरडे होतात, जळजळ होते, थकवा आणि डोकेदुखीचा त्रासही होतो. या त्रासाला डिजिटल आय स्ट्रेन म्हटलं जातं. सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, या समस्या होण्यामागे केवळ स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाशच आहे.
काय आहे सत्य?
बाजारात मिळणाऱ्या ब्लू लाईट चष्म्यांबाबत असा दावा केला जातो की, याच्या लेन्स निळा प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहोचू देत नाही. तसेच असाही दावा केला जातो की, या चष्म्यांनी डोळ्यांवर कमी दबाव पडतो आणि झोप चांगली लागते. कारण निळा प्रकाश आपल्या स्लीप हार्मोनवर प्रभाव टाकतो. पण विज्ञान आणि रिसर्च या दाव्यावर पूर्णपणे सहमत नाही. काही शोधातून समोर आलंय की, डोळ्यांचा थकवा दूर करण्यात ब्लू लाईट चष्मे फार जास्त प्रभावी नाहीत. डोळ्यात वेदना आणि कोरडेपणा येण्याचं मुख्य कारण निळा प्रकाश नाही तर ब्रेक न घेता स्क्रीन बघणं हे मुख्य कारण आहे. तसेच चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे आणि स्क्रीन बघताना पापण्या कमी उघडझाप करणे. केवळ एक चष्मा लावून या समस्या पूर्णपणे दूर केल्या जाऊ शकत नाही.
चष्म्याचा काही फायदा नाही का?
एक्सपर्ट सांगतात की, काही लोकांना या चष्म्यामुळे थोडा आराम जाणवू शकतो. खासकरून अशा लोकांना जे रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा लॅपटॉपवर काम करतात. या लोकांना हलका आराम मिळू शकतो किंवा त्यांच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये थोडा सुधार होऊ शकतो. पण या चष्म्यांना डोळ्यांच्या सुरक्षेचं एकमेव उपाय माननं योग्य ठरणार नाही.
डोळे सुरक्षित ठेवण्याचे उपाय
२०-२०-२० चा नियम - ही डोळ्यांना आराम देण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे. दर २० मिनिटांच्या कामानंतर स्क्रीनकडे बघणं थांबवा, कमीत कमी २० सेकंदासाठी २० फूट अंतरावरील एखाद्या वस्तूकडे बघा.
पापण्यांची उघडझाप - स्क्रीन बघताना भरपूर लोक पापण्या उघडझाप करण्यास विसरतात. नियमितपणे पापण्यांची उघडझाप केली तर डोळ्यांमध्ये ओलावा कायम राहतो.
स्क्रीनची सेटिंग - आपल्या स्क्रीनचा ब्राइटनेस व्यवस्थित सेट करा, तसेच डोळ्यांपासून स्क्रीनचं अंतरही योग्य ठेवा.
पुरेशी झोप - डोळ्यांचा थकवा चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं आवश्यक आहे. रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.