शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोनाचं अजून एक भयानक रूप माणसांमध्ये फैलावण्याचा धोका, चिंता वाढवणारी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 19:12 IST

CoronaVirus News & Latest Updates : डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे चीनमधील डुकरांना उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता.

जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचे आणखी एक रुप (स्ट्रेन) डुकरांना संक्रमित  करत होते. आता याचा धोका माणसांनाही असू शकतो. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या या रुपामुळे माणसांमध्ये संक्रमण पसरू शकतो. कोरोना व्हायरसच्या या रुपानं  २०१६ मध्य डुकरांमध्ये आजार पसरवला होता. 

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे चीनमधील डुकरांना उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. सुरूवातीला वटवाघळांमधून हा स्ट्रेन डुकरांमध्ये पोहोचला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं की, कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे माणसांच्या श्वसनतंत्र, यकृत आणि आतड्यांमध्येही व्हायरसचा  प्रसार होऊ शकतो. असं दिसून आलं की, रेमिडसिविर या औषधाचा वापर  कोरोनाच्या या स्ट्रेनसाठी परिणामकारक ठरतो. 

कोरोनाच्या या स्ट्रेनचे नाव Swine Acute Diarrhoea Syndrome Coronavirus आहे. डुकरांच्या पिल्लांसाठी हा व्हायरस जीवघेणा ठरू शकतो.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस कोरोना व्हायरसच्या प्रजातींपैंकीच एक आहे. फक्त याचे जीन्स वेगवेगळे आहेत. आतापर्यंत जवळपास ३ कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले असून १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. 

हिवाळ्याच्या दिवसांत कोरोना आणखी वेगाने पसरणार का?

श्वसन क्रीयेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या माध्यमाने (Respiratory droplets) थंडीच्या दिवसांत तो पसरण्याचा वेग अधिक वाढेल. या थेंबांच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता एका ताज्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. हे संशोधन Nano Letters जर्नलने प्रसिद्ध केले आहे. खुशखबर! एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची सुरक्षित अन् प्रभावी लस मिळणार, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. या संशोधनातील एक संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले, की हे थेंब सहा फुटांपेक्षाही अधिक दूर जातात हे त्यांच्या संशोधनातील अधिकांश प्रकरणांत दिसून आले आहे. एवढे अंतर अमेरिकेच्या CDCने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. काळजी वाढली! निरोगी, तरूणांना २०२२ पर्यंत कोरोना लस मिळणं अशक्य; WHO तज्ज्ञांचा दावा

थंड ठिकाणी धोका अधिक -

घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात. यानंतर ते जमिनीवर पडतात. अशात, हा व्हायरस काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंत संक्रमक होऊ शकतो, असे झू म्हणाले.

काळजी घेणे आवश्यक -

गरमीच्या दिवसांत एअरोसॉल ट्रान्समिशन अधिक धोकादायक असते, तर थंडीच्या दिवसांत थेंब. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण जेथे राहतो, तेथील तापमान आणि हवामानाप्रमाणे आपल्याला आपला बचाव करावा लागेल. जेणे करून व्हायरसच्या पसरण्याला आळा घालता येईल. थंड आणि गरम खोलीत सोशल डिस्टंसिंग अधिक असायला हवे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला