शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 23:34 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

-प्रमोद सुकरे, कराडगेल्या अनेक दिवसापासून तळ्यात -मळ्यात असणाऱे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय, कराड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मलकापूचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी गुरूवारी (६ नोव्हेंबर) रोजी आपल्या काँग्रेस सदसत्वाचा राजीनामा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे बरेच दिवस रखडलेला त्यांचा भाजप प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.

त्यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, 'मी आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे वेळोवेळी पार पाडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले.'

'माझे वडील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भास्करराव शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवनात काम केले. पक्षाने त्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली. याच पक्षाच्या माध्यमातून मिळालेली सत्ता हे समाजसेवेचे साधन मानून मलकापूर सारख्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मलकापूर 24 तास मीटरने नळ पाणीपुरवठा योजना राबवून राज्यातच नव्हे; तर देशात मलकापूरची ओळख निर्माण केली', असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 

'माझ्या वडिलांच्या पश्चात त्यांच्या विधायक आणि राजकीय कार्याचा वारसा म्हणून मी काम करण्याचा आजवर प्रामाणिक प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनात-राजकारणात मार्गक्रमण करत असताना मलकापूरसारख्या निमशहरी भागात विविध विकास कामे करीत असताना नागरिकांच्या हिताचे काही अभिनव विकास उपक्रम राबवले. ते केवळ राज्यातच नव्हे; तर देशातही मानदंड ठरले. मी या नेतृत्वाप्रति सदैव कृतज्ञ असेन. सध्याच्या काही अपरिहार्य परिस्थितीमुळे मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे', असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manohar Shinde resigns from Congress, sends resignation to Prithviraj Chavan.

Web Summary : Manohar Shinde, a close aide of Prithviraj Chavan, resigned from the Congress party. He sent his resignation to Chavan and the district president, fueling speculation about joining BJP.
टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPoliticsराजकारणcongressकाँग्रेस