काळजी वाढली! निरोगी, तरूणांना २०२२ पर्यंत कोरोना लस मिळणं अशक्य; WHO तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 05:04 PM2020-10-15T17:04:49+5:302020-10-15T17:06:49+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निरोगी आणि तरूण असलेल्या लोकांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस मिळणार नाही.

CoronaVirus News : Coronavirus healthy young covid 19 vaccine 2022 who | काळजी वाढली! निरोगी, तरूणांना २०२२ पर्यंत कोरोना लस मिळणं अशक्य; WHO तज्ज्ञांचा दावा

काळजी वाढली! निरोगी, तरूणांना २०२२ पर्यंत कोरोना लस मिळणं अशक्य; WHO तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसच्या प्रसाराने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातलं आहे. अशा स्थितीत लस कधी मिळणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटनसह अनेक देशांमधील लसीच्या चाचण्या या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशातच कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निरोगी आणि तरूण असलेल्या लोकांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस मिळणार नाही. 

एका सोशल मीडिया इवेंटदरम्यान जागतिक आरोग्य  संघटनेतील सदस्या सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, ''निरोगी आणि तरूण वयोगटातील लोकांना कोरोना व्हायरसची लस २०२२ पर्यंत  मिळू शकणार नाही. कारण कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून वयोवृद्ध आणि सगळ्यात जास्त धोका असलेल्या लोकांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे.'' बहुतेक लोक सहमत आहेत की आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंट-लाइन कामगारांपासून लसीकरणाची सुरूवात व्हायला हवी. याशिवाय लसीकरण वृद्धांपासून का सुरू करायला हवं याची कारणंही दिली जाणं आवश्यक आहेत.  असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

कोरोनाच्या लसीसाठी जागतिक स्तरावर खूप दबाव आहे. क्लिनिकल चाचणीसाठी डझनभर लसी या पुढे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ लस तयार करण्यासठी प्रयत्नरत असून लसीसाठी कोणताही शॉर्टकटचा वापर होत नाहीये ना, याची काळजी घेतली जात आहे. जॉन्सन अँड जॉन्सन आणि एस्ट्रॅाजेनेका या कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात आपली चाचणी थांबवली होती. अंतिम यशस्वी लस उपलब्ध झाल्यानंतर  अब्जावधी डोसचे उत्पादन करणे हे एक मोठे आव्हान असेल.

एंथनी फाउची का दावा

हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली होती धोक्याची सुचना

डब्ल्यूएचओने यापूर्वी म्हटले होते की " हर्ड इम्यूनिटी" प्राप्त होण्याच्या आशेने संक्रमण पसरवणे अनैतिक आहे आणि यामुळे अनावश्यक मृत्यू होऊ शकतात. हात-धुणे, सोशल डिस्टेंसिंग, ''मास्कचा वापर केल्यास रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. WHO चे प्रमुख ट्रेड्रोस अडनहॅम घेब्रियेसुस यांनी सांगितले होते की, ज्या व्हायरसबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. त्या व्हायरसचा प्रसार होऊ देणं योग्य नाही. या माहामारीपासून बचावासाठी कोणताही रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोनाच्या विरोधात इम्यूनिटी विकसित करण्याबाबत माहितीचा अभाव आहे.'' CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा

उदा. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास शरीरात आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडी किती दिवसांपर्यंत राहू शकतात याची कल्पना नसते. जास्तीत जास्त देशांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या ही व्हायरसच्या संपर्कात आली होती. अजूनही अनेक देश व्हायरसच्या प्रसाराबाबत असंवेदनशील आहेत. मागच्या चार दिवसात अमेरिका आणि युरोपच्या काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. खुशखबर! एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची सुरक्षित अन् प्रभावी लस मिळणार, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus News : Coronavirus healthy young covid 19 vaccine 2022 who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.