मोठा दिलासा! ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी तयार केली सुईविना कोरोना लस; 'अशी' ठरणार  प्रभावी

By Manali.bagul | Published: September 21, 2020 04:29 PM2020-09-21T16:29:35+5:302020-09-21T16:31:02+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी  सुई नसलेली कोरोनाची लस तयार केली आहे. या लसीची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. ही लस डीएनएवर आधारित लस असणार आहे.

CoronaVirus News : Dna based needle free coronavirus vaccine developed | मोठा दिलासा! ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी तयार केली सुईविना कोरोना लस; 'अशी' ठरणार  प्रभावी

मोठा दिलासा! ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी तयार केली सुईविना कोरोना लस; 'अशी' ठरणार  प्रभावी

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात आता दिवसाला सरासरी ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियातून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी  सुई नसलेली कोरोनाची लस तयार केली आहे. या लसीची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. ही लस डीएनएवर आधारित लस असणार आहे.

या लसीच्या चाचणीसाठी जवळपास १५० लोकांच्या नावाची नोंदणी करण्यात आली आहे. सिडनी युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेली कोरोनाची लस एक एयर जेट मशिनच्या माध्यमातून व्यक्तीच्या त्वचेत प्रवेश करते.  या मशिनला फार्माजेट असं म्हणतात.  डॉक्टर  गिन्नी मॅन्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार इंजेक्शनच्या तुलनेत ही लस अधिक परिणामकारक ठरेल. 

डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार ही नवीन लस व्यक्तीच्या त्वचेमार्फत शरीरात प्रवेश कते.  शरीराची रोगप्रतिकारकशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी त्वचेची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे त्वचेवर दिली जाणारी ही लस अधिक परिणामकारक ठरू शकते. डॉक्टर गिन्ना मेन्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस नवीन तंत्रावर आधारीत आहे. सगळ्यात आधी व्यक्तीची इम्युन सिस्टिम डीएनएच्या एका लहानश्या भागाला ओळखून आपले एंटीजन्स तयार करेल. 

या जेट सिस्टम लसीमुळे वेदनांपासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. पण सुईमुळे त्वचेवर होत असलेल्या समस्यांना टाळता येऊ शकतं. ऑस्ट्रेलियन सरकारनं लस विकसीत करत असलेल्या कंपन्यांना ३ मिलियन  डॉलरचा निधी देण्याचे घोषित केल्यानंतर लस तयार होण्याची माहिती समोर आली आहे. 

Vaccine

चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

गांसु प्रांतांची राजधानी लान्चो येथील आरोग्य आयोगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारानं आतापर्यंत ३ हजार २४५ लोकांना संक्रमित केलं असून ब्रुसेलोसिस हे या आजाराचं नाव आहे. चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार प्राण्यांपासून पसरतो. १ हजारापेक्षा जास्त लोकांमध्ये या आजाराचं संक्रमण झालेलं दिसून आलं आहे.

लांझोऊ प्रांतात ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी २९ लाख लोकांपैकी २१ हजार ८४७ लोकांची चाचणी करण्यात आली आहे.प्राण्यांतून ब्रुसेला हा विषाणू माणसात संक्रमित होऊन हा आजार होतो. त्यामुळे पुरुषांच्या अंडकोषांना सूज येण्याची शक्यता असते. तसेच हा आजार जडलेल्यांपैकी काही जणांची जननक्षमता नष्ट होण्याचा धोका संभवतो. 

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आजाराला Malta fever किंवा Mediterranean fever या नावानं ओळखलं जातं. या आजारात डोकेदुखी, मासपेशींतील वेदना, ताप येणं, थकवा येणं ही लक्षणं दिसून येतात. चीनने ब्रुसेलोसिसने आजारी असलेल्यांच्या तपासणीसाठी लांझोऊ प्रांतात मोठी मोहीम उघडली आहे. ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

हे पण वाचा-

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus News : Dna based needle free coronavirus vaccine developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.