शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 10:37 AM

देशातील कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली असतानाच कोरोना विषाणूबाबत अजून चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआता कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्स कमी होत असल्याचे आले समोर सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतातकोरोनाबाधित रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक घटून २० हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे

नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या काही दिवसांपासून अधिकच गंभीर रूप धारण केले आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली असतानाच कोरोना विषाणूबाबत अजून चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोना विषाणूने रूपांतर केले असून, आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्युप्रमाणे प्लेटलेट्स कमी होत असल्याचे समोर आले आहे.सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. मात्र आता हे लक्षण कोरोनाच्या रुग्णांमध्येही दिसू लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक घटून २० हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र संबंधित रुग्णाची डेंग्यूची चाचणी केल्यास त्यामध्ये संबंधित रुग्णास डेंग्यू नसल्याचे समोर येत आहे. तसेच असे रुग्ण हे आजार गंभीर अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर सापडत आहेत.याबाबत पीजीआयचे प्राध्यापक अनुपम वर्मा यांनी सांगितले की, रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये अचानक मोठी घट होत असल्याने अशा रुग्णाची प्रकृती स्थिर राखणे कठीण होत आहे. पीजीआयमध्ये दाखल झालेल्या लोकबंधू रुग्णालयामधील एका डॉक्टरच्या प्लेटलेट्स भरती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहा हजारांवर पोहोचल्या होत्या.कोरोना विषाणू रुग्णांचा इम्युन कॉम्प्लेक्स बिघडवत आहे. त्यामध्ये मोनोसाइड आणि मॅकरोफेज सेलवर हल्ला होत आहे. यामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची गरज वाढत आहे. मात्र त्याची शरीरामधील निर्मिती आधीपेक्षा कमी होते. त्यामुळेच प्लेटलेट्स काऊंट अचानकपणे कमी होत आहे. अशा रुग्णांची प्रकृती बहुतकरून गंभीर असते. त्यांना प्लेटलेट्स दिल्या जातात. तसेच गरज पडल्यास प्लाझ्मा थेरेपीसुद्धा दिली जाते.या सर्वामुळे आताच्या परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांची डेंग्यूची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. विशेषकरून ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्स काऊंटमध्ये घट होत आहे, अशांची चाचण होणे अधिक आवश्यक आहे. त्यामधून संबंधित रुग्णाला डेंग्यू आहे की कोरोना निश्चित होऊ शकेल. तसेच याबाबत अधिक शोध सुरू आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य