शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

coronavirus : कोरोनासारखेच घातक आहेत प्राण्यांमधून मनुष्यात शिरणारे 'हे' व्हायरस, तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:03 AM

कोरोनासारखे असे अनेक व्हायरस आहेत ज्याची लागण हे प्राण्यांच्या माध्यमातून मनुष्यांना होते.

आतापर्यंत समोर आलेल्या वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, कोरोना व्हायरस (COVID19) जनावरांमधून मनुष्यांपर्यंत पोहोचला. कोरोनासारखे असे अनेक व्हायरस आहेत ज्यांनी याआधीही थैमान घातलं होतं. हे व्हायरस सुद्धा जनावरांच्या माध्यमातून मनुष्यांपर्यंत पोहोचले होते. अर्थात कोरोनामुळे जगभरात फार जास्त लोकांचा मृत्यू झाला. पण प्राण्यांमुळे पसरणाऱ्या व्हायरसबाबत माहिती असली पाहिजे. चला जाणून घेऊ अशा व्हायरसबाबत...

मरबर्ग व्हायरस

1967 मध्ये आफ्रिकेतील युगांडामध्ये मरबर्ग व्हायरस पसरला होता. हा व्हायरस वटवाघूळच्या माध्यमातून मनुष्यांपर्यंत पोहोचला होता आणि याने लोकांना लागण झाली होती. या व्हायरसने 590 लोक संक्रमित झाले होते आणि 478 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

निपाह व्हायरस 

1979 मध्ये मलेशियात निपाह व्हायरस हा खास प्रजातीच्या वटवाघुळातून आला आहे. त्यानंतर अनेक देशांना या व्हायरसने आपल्या जाळ्यात घेतलं होतं. मलेशियामध्ये या व्हायरसने 496 लोक संक्रमित झाले होते आणि त्यातील 264 लोकांचा मृत्यू झाला होता.

सार्स व्हायरस

2002 मध्ये सार्स व्हायरस चीनमध्ये पसरला होता. यावेळीही हा व्हायरस प्राण्यातून मनुष्यांमध्ये शिरला होता. चीनमध्ये 8098 लोकांना याची लागण झाली होती आणि 774 लोकांना यात आपला जीव गमवाव लागला होता.

H5N1व्हायरस 

2003 मध्ये बर्ड फ्लू H5N1 व्हायरस कोंबड्यांच्या माध्यमातून पसरला होता. चीनमध्ये 861 लोकांना याची लागण झाली होती तर 455 लोक मृत्यूमुखी पडले होते.

स्वाइन फ्लू

2009 मध्ये अमेरिका-मेक्सिकोमधून स्वाइन फ्लू जगभरात पसरला होता. हा व्हायरस डुकरांमधून आला होता. या व्हायरसमुळे 10 लोक संक्रमित झाले होते. तर 1.23 लाख ते 2.05 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

मेर्स व्हायरस

2012 मध्ये सौदी अरबमध्ये मेर्स व्हायरसच्या जाळ्यात अडकला होता. उंटाच्या माध्यमातून हा व्हायरस मनुष्यांमध्ये पसरला होता. या व्हायरसची लागण तिथे 2494 लोकांना झाली होती. त्यातील 858 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

बर्ड फ्लू H7N9 

2013 मध्ये बर्ड फ्लू H7N9 पसरला होता. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसने 1568 लोकांना शिकार केले होते. यातील 616 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स