CoronaVirus : Coronavirus pandemic turning us into couch potatoes says study | काळजी वाढली! लॉकडाऊनमुळे मानसिक ताणासह 'या' आजाराचा वाढतोय धोका, संशोधनातून खुलासा

काळजी वाढली! लॉकडाऊनमुळे मानसिक ताणासह 'या' आजाराचा वाढतोय धोका, संशोधनातून खुलासा

कोरोनामुळे सगळ्यांच्याच जीवनशैलीवर मोठा परिणाम घडून आला. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे लोकांना घरी राहण्याशिवाय  कोणताही पर्याय नव्हता. यामुळे नेहमी स्वयंपकघरात राहून  काम करत असललेल्या गृहिणींनाही त्रासाचा सामना करावा लागला. जास्त वेळ गॅससमोर उभं राहून काम करणं आणि सतत काम करत राहणं यामुळे त्यांना मिळणारा वेळही  कमी झाला. कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान झालेल्या एका अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊमुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव झाला असला तरी वेगवेगळ्या आजारांनी लोकांना घेरले आहे. जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका अमेरिकन अभ्यासानुसार असं दिसून आलं की, कोरोनाच्या या महासंकटात आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे.  अशा स्थितीत काही देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या लाटेमुळे जगभरातील माहामारीच्या आजाराशी संबंधित इतर अडचणी मोठ्या प्रमाणात सतावत आहेत. 

आता वेल्स आणि आयरिश नागरिकांना पुन्हा लॉकडाउन करावं लागलं आहे आणि फ्रान्सने देखील लॉकडाऊनचे नवे लॉकडाऊनचे नियम जाहीर केले आहेत. यामध्ये अनेक व्यावसाय बंद राहणार आहेत. अनेकांनी मार्च, एप्रिल या महिन्यात घरी राहण्याचा आनंद घेतला. एप्रिल 2020 मध्ये बॅटन रौगमध्ये पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनात  जगभरातील 7753 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यात असं दिसून आले की लॉकडाऊन प्रत्येकासाठी चांगला आणि आरोग्यासाठी उत्तम ठरला असं दिसून आलेलं नाही. ओबेसिटी' मध्ये प्रकाशित केलेल्या माहितीवरून असं दिसून आलं आहे की बाहेर जेवणाच्या जागी घरी स्वयंपाक करून खाल्ल्यामुळे काहींना खाण्याच्या चांगल्या सवयी लागल्या. तर अनेकांना घरी असल्यामुळे टिव्ही पाहताना किंवा इतर काम करताना वारंवार खाण्याची सवय लागली. 

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश

लॉकडाउनच्या आधी या संशोधनात सहभाभागी असलेल्या लोकांपैकी 32 टक्के लोकांचं लॉकडाउनपूर्वीचं वजन सामान्य होतं, तर 32 टक्के लोकांचं जास्त वजन होतं आणि 34 टक्के लठ्ठपणाने त्रासलेले होते. एकूण लोकांच्या  27.5 टक्के लोकांमध्ये वजन वाढ आणि 33.4 टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा आहे. संशोधकांनी या वजन वाढण्याचं कारण अधिककाळ घरात बसून राहणं आणि शारीरिक हालचालींना कमी वेळ देणं हे असल्याचं म्हटलं आहे. या अभ्यासात असंही दिसून आलं की, काळजी करण्याचे प्रमाण वाढून चिंतेच्या पातळीमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे लोकांच्या झोपेवर परिणाम  झाला होता.  

सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण...

कोरोनाच्या माहामारीमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडून आला आहे. सरकारच्या आदेशांचे पालन करत असताना  मनात कोरोना संसर्गाची भिती ठेवल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या मोठ्या प्रमाणवर उद्भवल्या आहेत. म्हणून लोकांना वजन वाढण्याच्या आणि लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.  कोरोनाच्या 'ऑटोअँटीबॉडीज'नी वाढवली चिंता; व्हायरसऐवजी शरीरावर करताहेत हल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : Coronavirus pandemic turning us into couch potatoes says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.