Fill petrol while sitting on a bike at petrol pump benzene vapours could be dangerous for lungs | सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण...

सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण...

बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरून घेणं हा अनेकांच्या रोजच्या जीवनातील एक भाग असतो. अनेकदा पेट्रोल पंपावर खूप मोठी रांग असते. त्यामुळे वाहनात पेट्रोल भरून घेण्यासाठी बराचवेळ वाट पाहावी लागू शकते. तुम्हाला कल्पनाही नसेल, पेट्रोलमध्ये असलेल्या बेंझिन या घातक पदार्थांमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. श्वासांच्या माध्यमातून हा गॅस फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. गाडीत पेट्रोल भरून घेत असताना आजूबाजूला असल्यासही शारीरिक समस्या वाढण्याचा धोका असतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर एका मर्यादेपेक्षा  जास्त प्रमाणात बेंझिनची पातळी शरीरात वाढली तर कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणं, बेशुद्ध पडणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

बेंझिन एक  ज्वलनशील हायड्रोकार्बन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, पेट्रोलमध्ये एक पीपीएम (प्रति भाग दशलक्ष) प्रमाणित प्रमाण असते, परंतु असे बरेच वेळा पाहिले गेले आहे की कंपन्या बेंझिन पेट्रोलमध्ये प्रमाणपेक्षा दहापट जास्त मिसळतात, ज्यामुळे लोकांना त्रास होतो. एनजीटी आणि सीपीसीबीने याबाबत अनेकदा मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, परंतु बर्‍याच वेळा कंपन्या या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि लोकांना किंमत मोजावी लागते.

कसा होतो शरीरात प्रवेश

जेव्हा पेट्रोल हवेच्या संपर्कात येते तेव्हा बेंझिनचे प्रमाण हवेमध्ये विरघळते आणि आपल्या शरीरात प्रवेश करण्यास सुरवात करते. लोक पेट्रोल पंपांवर जास्त काळ थांबल्यास बेंझिनशी  संपर्क येण्याची शक्यता असते. आपण दुचाकीवर बसून पेट्रोल भरत असल्यास, हवेत पेट्रोलमधील बेंझिन गॅस मिसळण्याची आणि दुचाकीस्वाराच्या नाकातून थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.  सामान्य ग्राहकांच्या तुलनेत त्याचे सर्वात मोठे नुकसान पेट्रोल पंपावर आठ ते 12 तास काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना होते. मोठ्या टँकमध्ये पेट्रोल भरणारे किंवा रिफायनरीजमध्ये काम करणारे कर्मचारी या गॅसच्या संपर्कात येण्याची शक्यता असते.

बचावाचे उपाय

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरत असलेल्या नोजलसह स्टेज 1 आणि 2 वाफ रिकव्हरी सिस्टम लावणे आवश्यक आहे. हे नोजलने बसवल्यामुळे गॅस परत पेट्रोलमध्ये मिसळतो. नोजलवर रबरचे चांगले आवरण असल्यामुळे, पेट्रोल भरताना कमी गॅस बाहेर पडल्याने होणारं नुकसान टाळता येतं. 

जे लोक पेट्रोल रिफायनिंग कंपन्यांमध्ये काम करतात किंवा जे कर्मचारी पेट्रोल पंपांवर काम करतात त्यांना अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते आणि त्यांना पेट्रोल कंपनी किंवा पेट्रोल पंप मालकाने सुरक्षा प्रदान केली पाहिजे. सीपीसीबीनेही काही कंपन्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन कंपन्यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. coronavirus: दिलासादायक! देशातील ९१% रुग्णांनी कोरोनावर केलेली मात

तज्ज्ञ काय सांगतात

टेरीच्या वरिष्ठ सहकारी मीना सहगल यांनी अमर उजाला यांना सांगितले की, '' अनेक कंपन्या याबाबत सुरक्षा उपाय अवलंबण्याबाबत बेफिकीर आहेत, त्यामुळे  सर्वसामान्यांना  त्रास सहन करावा लागत आहे. जर तुम्ही पेट्रोल भरणार असाल तर लक्षात ठेवा की अशा वेळी आपल्याला जास्त वेळ पेट्रोल भरण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.  पेट्रोल भरले तरीही थेट पंपच्या वर किंवा जवळ जाऊ नका.  लांब राहिल्यास बेंझिनपासून आपले संरक्षण  होण्यास मदत होईल. पेट्रोल पंप कामगारांनी त्यांच्या मालकांशी बोलायला हवं आणि नोजलमध्ये स्टेज 1 आणि 2 चे सुरक्षा व्यवस्था स्थापित करणं उत्तम ठरेल, जेणेकरून कर्मचारी आणि ग्राहक दोघेही सुरक्षित असतील.'' सावधान! 'ही' ५ लक्षणं असल्यास कोरोना संक्रमणानंतर उद्भवतोय 'लॉन्ग कोविड' चा धोका, रिसर्च 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fill petrol while sitting on a bike at petrol pump benzene vapours could be dangerous for lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.