coronavirus: 91% of patients in the India overcome corona | coronavirus: दिलासादायक! देशातील ९१% रुग्णांनी कोरोनावर केलेली मात

coronavirus: दिलासादायक! देशातील ९१% रुग्णांनी कोरोनावर केलेली मात

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी ४५ हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांच्या घरात पोहोचली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या ७२ लाख ५९ हजारांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.८५ टक्के आहे. कोरोनामुळे आणखी ५०८ जणांचा मृत्यू झाला असून, बळींची एकूण संख्या १,२०,०१० वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७९,९०,३२२ असून, बुधवारी ४३,८९३ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. बरे झालेल्यांची संख्या ७२,५९,५०९ आहे.  उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहा दिवस ७ लाखांहून कमी आहे. उपचार घेत असलेल्यांची संख्या बुधवारी ६,१०,८०३ होती.  हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.६४ टक्के आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने सांगितले की, २७ ऑक्टोबरला देशात १०,६६,७८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे आता या चाचण्यांची एकूण  संख्या १०,५४,८७,६८० झाली  आहे. 

कोरोना बळींची संख्या कर्नाटकमध्ये १०,९९१,  उत्तर प्रदेशात ६,९४०, आंध्र प्रदेशमध्ये ६,६२५, पश्चिम बंगालमध्ये ६,६०४, दिल्लीत ६,३५६, पंजाबमध्ये ४,१३८, गुजरातमध्ये ३,६९५ आहे. 

रुग्णांचा भारतात मृत्यूदर अवघा दीड टक्का
 10 लाखांमागे कोरोना रुग्णांचे कमी प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारताने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्का इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.  
5,552 कोरोना रुग्ण जागतिक पातळीवर दर दहा लोकांमागे सापडतात.  
5,790 भारतामध्ये हेच प्रमाण इतके आहे.  
अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, दक्षिण आफ्रिकेत दर दहा लोकांमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण भारतापेक्षाही अधिक आहे. 
८७ रुग्णांचा मृत्यू देशात दर दहा लाख लोकांमागे होतो. जागतिक स्तरावर हाच आकडा १४७ इतका आहे.

English summary :
91% of patients in the India overcome corona

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: 91% of patients in the India overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.