नवी दिल्ली - आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय समस्या न राहता एक मोठे आव्हान बनली आहे. मात्र, योग्य आहार आणि संतुलित दिनचर्या याद्वारे या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे मत आहारतज्ज्ञ अंजली फाटक यांनी व्यक्त केले आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे या दोन्ही गोष्टी फर्टिलिटीवर परिणाम करतात, त्यामुळे सकस आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्ती अत्यंत आवश्यक आहे.
अन्न, फर्टिलिटी यांचा संबंधआपला आहार थेट हार्मोन्सचे संतुलन, स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतो. असंतुलित आहारामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि सूज वाढते, ज्यामुळे महिलांमध्ये पीसीओएस आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होण्यासारख्या समस्या उद्भवतात.
प्रजनन क्षमतेसाठी घातक घटक ट्रान्स फॅट : तळलेले पदार्थ आणि बेकरी उत्पादने.हाय जीआय फूड्स : मैदा, पांढरा ब्रेड व शीतपेये.व्यसने : अतिप्रमाणात कॅफिन, मद्यपान व धूम्रपान.जीवनशैली : तणाव, निद्रानाश व असंतुलित वजन.
काय काळजी घ्यावी?तज्ज्ञांच्या मते, केवळ आहारच नाही तर रोजचा व्यायाम, योग आणि ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. शरीराला विश्रांती देण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे अनिवार्य आहे. वजन संतुलित ठेवल्यास हार्मोन्सचे संतुलन राखणे अधिक सोपे होते. यात महिलांसाठी पालेभाज्या, फळे, डाळिंब व संत्री, अक्रोड, जवस, जव, ओट्स, बाजरी, दूध व दही उपयुक्त असतात.
संशोधनात काय म्हटले आहे?२०२५ मध्ये झालेल्या एका मोठ्या संशोधनानुसार, आहारात जंक फूड आणि हाय-इन्फ्लेमेटरी पदार्थांचा समावेश असल्यास वंध्यत्वाचा धोका दुपटीने वाढू शकतो. याउलट, पोटाचे आरोग्य चांगले ठेवणारा आहार फर्टिलिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पुरुषांनी शुक्राणूंची निर्मिती व आरोग्य वाढवणारे पदार्थ जसे की, टोमॅटो, गाजर व रंगीत भाज्या, डाळी, पनीर खावेत.
Web Summary : Junk food significantly increases infertility risk, experts warn. Balanced diets, exercise, and stress management are crucial. Prioritize whole foods, manage weight, and ensure adequate sleep for improved fertility in both men and women.
Web Summary : विशेषज्ञों का कहना है कि जंक फूड बांझपन का खतरा बढ़ाता है। संतुलित आहार, व्यायाम और तनाव प्रबंधन महत्वपूर्ण हैं। बेहतर प्रजनन क्षमता के लिए संपूर्ण खाद्य पदार्थों को प्राथमिकता दें, वजन प्रबंधित करें और पर्याप्त नींद लें।