जेन-झी तरुणाईला पाठदुखीचा विळखा! २२व्या वर्षीच होताहेत मणक्याचे विकार, दर तिसरा दुचाकीस्वार त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:53 IST2026-04-21T14:52:41+5:302026-04-21T14:53:07+5:30

आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 

Back pain plagues Gen-Z youth! Spinal disorders are occurring at the age of 22, every third biker suffers | जेन-झी तरुणाईला पाठदुखीचा विळखा! २२व्या वर्षीच होताहेत मणक्याचे विकार, दर तिसरा दुचाकीस्वार त्रस्त

जेन-झी तरुणाईला पाठदुखीचा विळखा! २२व्या वर्षीच होताहेत मणक्याचे विकार, दर तिसरा दुचाकीस्वार त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले आहे की, दर तिसरा तरुण दुचाकीस्वार आज पाठीच्या गंभीर व्याधीने ग्रासलेला आहे.

अभ्यासात काय आढळले?

कॉलेज विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या एका विशेष अभ्यासानुसार, जवळपास ३८ टक्के तरुण दुचाकीस्वार 'स्पाइनल पेन' म्हणजेच कंबर, पाठ आणि मानदुखीच्या विळख्यात अडकले आहेत. या त्रासाने ग्रस्त असलेल्या तरुणांचे सरासरी वय अवघे २२ वर्षे आहे. ज्या वयात शारीरिक क्षमता सर्वाधिक असते, त्याच वयात मणक्याचे विकार होणे हे भविष्यासाठी घातक मानले जाते.

पाठदुखीची मुख्य कारणे

संशोधकांच्या मते, या समस्येमागे केवळ दुचाकी चालवणे हे एकमेव कारण नसून, चालवण्याची पद्धत आणि इतर घटकही कारणीभूत आहेत.

चुकीची बसण्याची पद्धत: दुचाकीवर बसताना पाठीचा कणा ताठ न ठेवता वाकून बसणे हे या वेदनांचे मुख्य कारण.
खराब रस्ते आणि ट्रॅफिक: रस्त्यांवरील खड्डे आणि सततच्या ट्रॅफिकमुळे होणारे व्हायब्रेशन्सने मणक्याला इजा पोहोचते.
शारीरिक हालचालींचा अभाव: व्यायामाची कमतरता आणि एकाच स्थितीत तासन्तास बसून राहिल्याने स्नायू कमकुवत होतात.

कोणाला आहे सर्वाधिक धोका?

वजन जास्त असलेल्या दुचाकीस्वारांमध्ये पाठीच्या वेदना होण्याची शक्यता ही २.७८ पटीने जास्त असते.
मुलांच्या तुलनेत मुलींना या वेदनांची झळ पोहोचण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले आहे.
जे तरुण नियमित व्यायाम करत नाहीत, त्यांच्यात हा धोका २.२४ पटीने अधिक वाढतो.

अशी घ्या स्वतःची काळजी

ब्रेक घ्या: लांबच्या प्रवासाला किंवा राइडला जाताना मध्येच थोडा वेळ थांबून शरीराला विश्रांती द्या.
वजन नियंत्रित ठेवा : वाढत्या वजनाचा थेट ताण मणक्यावर पडतो, त्यामुळे बीएमआयकडे लक्ष द्या.
नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस व्यायाम केल्याने पाठीचे स्नायू बळकट होतात.
पुरेशी झोप : चांगली झोप घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि स्नायू पुन्हा कार्यक्षम होतात.

Web Title : जेन-ज़ी को पीठ दर्द का संकट: युवा वयस्कों को रीढ़ की समस्याएँ

Web Summary : हाल ही में एक अध्ययन से पता चला है कि तीन में से एक युवा भारतीय बाइक सवार रीढ़ की हड्डी के दर्द से पीड़ित है, जो अक्सर सिर्फ 22 साल की उम्र में शुरू होता है। कारकों में खराब मुद्रा, खराब सड़कें, व्यायाम की कमी और अधिक वजन शामिल हैं। विशेषज्ञ ब्रेक, वजन प्रबंधन, व्यायाम और पर्याप्त नींद की सलाह देते हैं।

Web Title : Gen Z Faces Back Pain Crisis: Spinal Issues Plague Young Adults

Web Summary : A recent study reveals that one in three young Indian bikers suffers from spinal pain, often starting at just 22. Factors include poor posture, bad roads, lack of exercise, and being overweight. Experts recommend breaks, weight management, exercise, and adequate sleep.