शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पालकांनो वेळीच व्हा सावध! दरवर्षी सुमारे २० लाख मुलांना होऊ शकतो अस्थमा- संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:20 IST

अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (George Washington University) संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, वाहतूक प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी सुमारे २० लाख मुलांना दमा (asthma) होऊ शकतो.

दिवसेंदिवस वाढत असलेले हवा प्रदूषण (Air Pollution) हे संपूर्ण जगासाठी मोठे आव्हान बनत चालले आहे. वायू प्रदूषणाचे कारण केवळ औद्योगिकीकरण किंवा कार्बन उत्सर्जन (industrialization or carbon emissions) नाही, तर जगातील सर्वच देशांमधील सतत वाढत जाणारी वाहतूक (Traffic) हेही यामागे मोठे कारण आहे. वाहतुकीतून निघणारा विषारी धूर (poisonous smoke) मानवाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी किती घातक आहे, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (George Washington University) संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, वाहतूक प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी सुमारे २० लाख मुलांना दमा (asthma) होऊ शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष 'द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ' (The Lancet Planetary Health) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. हवा प्रदूषणामुळे आपल्या शरीराचे अवयव आणि शरीराची नियमित प्रक्रिया खराब होतात. यामध्ये COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्रोन्कियल अस्थमा यांचाही समावेश होतो.

दमा हा एक क्रॉनिक डिजीज आहे. ज्यामुळे फुफ्फुसीय वायुमार्गात (pulmonary airways) इंफ्लेमेशन (सूज येणे) होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत दुखते, खोकला आणि घबराट होते. दम्याचा झटका येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील श्लेष्मा आणि श्वासनलिका अरुंद होणे, परंतु याशिवाय दम्याचा झटका येण्यामागे अनेक बाह्य कारणे आहेत, ज्यामुळे अचानक दम्याचा झटका येतो. अशा परिस्थितीत रुग्णांना इन्हेलर घेण्यास सांगितले जाते.

तज्ज्ञ काय म्हणतातजॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्याच्या प्राध्यापक आणि या अभ्यासाच्या सह-लेखिका सुसान एनेनबर्ग यांच्या मते, त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की नायट्रोजन डायऑक्साइडमुळे मुलांमध्ये दमा होऊ शकतो. ही समस्या विशेषतः शहरी भागात जास्त आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छ हवेचे धोरण महत्त्वाचे मानले पाहिजे.

अभ्यास कसा झाला?सुसान अ‍ॅनेनबर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहने, पॉवर प्लांट्स आणि औद्योगिक साइट्सच्या आसपास नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) च्या जमिनीच्या ग्राउंड कंसंट्रेशन (ground concentration) चा अभ्यास केला. यासह, त्यांनी २०१९ ते २०२० या कालावधीत मुलांमध्ये दम्याच्या नवीन प्रकरणांचा मागोवा घेतला. यादरम्यान, असेही आढळून आले की NO 2 मुळे, २००० मध्ये मुलांमध्ये दम्याचे प्रमाण २० टक्के होते, जे २०१९ मध्ये १६ टक्क्यांवर आले. हे सूचित करते की युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये, स्वच्छ हवेचा फायदा विशेषतः गजबजलेल्या रस्त्यांजवळ आणि औद्योगिक साइट्सजवळ राहणाऱ्या मुलांना झाला आहे. त्यामुळे, उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी NO च्या उत्सर्जनावर अधिक प्रभावीपणे अंकुश ठेवण्याची अजूनही गरज आहे.

काय केले जाऊ शकतेदुसर्‍या अभ्यासात, सुसान अॅनेनबर्ग (Susan Anenberg) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की २०१९ मध्ये १.८ दशलक्ष मृत्यू शहरी वायु प्रदूषणाशी संबंधित आहेत. तसेच शहरांमध्ये राहणारे 86 टक्के प्रौढ आणि मुले दूषित कणांच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा जास्त पातळी असलेल्या वातावरणात राहण्यामुळे अधिक आजारी आहेत. एनेनबर्ग म्हणाले की, जीवाश्म इंधन वाहतूक कमी करून आपण मुले आणि वृद्धांना चांगल्या हवेचा श्वास घेण्यास मदत करू शकतो. यामुळे मुलांमध्ये दमा आणि त्यांचा मृत्यूही कमी होऊ शकतो. यासोबतच हरितगृह वायूचे उत्सर्जनही कमी होईल, ज्यामुळे निरोगी वातावरण निर्माण होऊ शकेल.

अभ्यासात काय झालेया अभ्यासात असे आढळून आले की, २०१९ मध्ये, अंदाजे १८.५ लाख मुलांमध्ये दम्याच्या नवीन प्रकरणांचे कारण नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) होते. यापैकी दोन तृतीयांश शहरी भागात होते. अमेरिका आणि इतर श्रीमंत देशांमध्ये स्वच्छ हवेसाठी घेतलेल्या कठोर उपाययोजनांमुळे मुलांमध्ये NO2 शी संबंधित दम्याची प्रकरणे कमी झाली आहेत. युरोप, अमेरिका, दक्षिण आशियातील देश, उप-सहारा आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा असूनही, विशेषत: NO2 मुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. मुलांमध्ये NO2 दमा ही दक्षिण आशियातील आणि उप-सहारा आफ्रिकन देशांमधील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स