रोज एक ग्लास प्या हा खास ज्यूस, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:43 PM2023-12-12T13:43:37+5:302023-12-12T13:44:45+5:30

Home made Juice for Skincare: याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर रोज हा ज्यूस प्यायले तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाही आणि गालही टवटवीत होतील.

Amla and beetroot juice for wrinkles and glowing skin | रोज एक ग्लास प्या हा खास ज्यूस, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!

रोज एक ग्लास प्या हा खास ज्यूस, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!

Home made Juice for Skincare: आजकालच्या धावपळीच्या जीवनात सगळेच आपल्या लाइफस्टाईलमुळे वैतागलेले असतात. बरेच लोक वेगवेगळ्या अडचणींमुळे काही करू शकत नाहीत. प्रदूषणामुळे ही समस्या अधिक जास्त वाढली आहे. यामुळे त्वचा आणि आरोग्यासंबंधी समस्या अधिक वाढल्या आहेत.

अशात तुम्ही एका खास ज्यूसने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. आवळा आणि बिटाचा एक खास ज्यूस बनवू शकता. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर रोज हा ज्यूस प्यायले तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाही आणि गालही टवटवीत होतील.

आवळा आणि बिटाचा ज्यूस तयार करण्यासाठी सगळ्यात आधी 1 बीट, 1 आवळा, 3 चमचे चिया सीड्स, एक पाणी आणि थोडा कोथिंबीर घ्या. त्यानंतर सगळ्यात आधी बीट, आवळा आणि कोथिंबीर बारीक करा.

आता यात चिया सीड्स मिक्स करा आणि बारीक करून ज्यूस बनवा. घट्ट झाल्यावर यात थोडं पाणी टाका. 

नियमितपणे 1 ग्लास या ज्यूसचं सेवन केल्यास आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसू लागेल.

बीट आणि आवळ्याच्या ज्यूसचे फायदे

सुरकुत्या दूर होतील

बीट आणि आवळ्यापासून तयार ज्यूस प्यायल्याने तुम्हाला सुरकुत्यांपासून सुटका मिळेल. यात अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे तुम्हाला खूप मदत करतात.

डाग दूर करण्यासाठी

या ज्यूसचं नियमितपणे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सगळे डाग दूर होण्यास मदत मिळते. तसेच याच्या सेवनाने त्वचा हायड्रेट राहते.

त्वचा चमकदार करण्यास फायदेशीर

त्वचा चमकदार आणि ताजीतवाणी करण्यासाठी बीट आणि आवळ्याचा ज्यूस फायदेशीर ठरतो. याने रक्त शुद्ध होतं आणि बॅक्टेरियासोबत लढण्याची मदत मिळते.

Web Title: Amla and beetroot juice for wrinkles and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.