शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

मूळव्याध मूळापासून नष्ट करेल ही 7 आयुर्वेदिक पाने, घरच्या घरी होऊन जाईल उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 10:33 IST

Piles Ayurvedic Treatment: पाईल्सची समस्या दोन प्रकारची असते. काही केसेसमध्ये फोड बाहेरून असतात तर काहींमध्ये आतून. आतून जे फोड असतात त्यातून रक्त येऊ शकतं.

Piles Ayurvedic Treatment: पाईल्स म्हणजे मूळव्याध ही एक कॉमन समस्या आहे. ज्याने अनेक लोक पीडित असतात. पाईल्स झाल्यावर मलाशयात गाठ किंवा फोड होतो. ज्यामुळे असह्य वेदना होतात. अनेकदा या फोडांमधून रक्तही येतं. पाईल्सचं सगळ्यात मोठं कारण बद्धकोष्ठता आहे. कारण जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा मलाशयाजवळ फोड येतात. पाईल्सची समस्या दोन प्रकारची असते. काही केसेसमध्ये फोड बाहेरून असतात तर काहींमध्ये आतून. आतून जे फोड असतात त्यातून रक्त येऊ शकतं.

पाईल्सची लक्षणं

पाईल्स झाल्यावर मलायशाच्या भागात वेदना होतात आणि खाज येते. यात सकाळी मलत्याग करताना रक्त येऊ शकतं. पाईल्सच्या सगळ्यात गंभीर स्थितीमध्ये मलाशयातून मांसपेशी बाहेर येण्याची स्थिती होऊ शकते. ज्याला प्रोलॅप्स म्हटलं जातं. 

पाईल्सवर उपाय काय आहेत?

मेडिकलमध्ये पाईल्सवर अनेक औषधं आणि उपचार आहेत. गंभीर स्थितीमध्ये अनेक सर्जरीची सुद्धा गरज पडते. पण जर तुम्हाला सर्जरी न करता पाईल्सची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक पानांचा आधार घेऊ शकता. 

कडूलिंबाची पाने

कडूलिंबाच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि एनाल्जेसिक गुण असतात. यात सूज आणि वेदना कमी करण्याची क्षमता असते. यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडून घ्या आणि हे पाणी पार्श्वभाग स्वच्छ करण्यासाठी वापरावं. तसेच कडूलिंबाची काही कच्ची पाने चाऊन खावीत. याने आतून आराम मिळतो.

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. याने पचनात मदत मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते. याच्या सेवनाने वेदना आणि सूजही कमी होते. यासाठी तुळशीच्या पानांना बारीक करून रस काढा आणि त्यात थोडं मध टाका. या मिश्रणाचं नियमित सेवन करा.

एलोवेराची पाने

यात आराम देणारे आणि सूज कमी करणारे गुण असतात. तसेच याने जळजळही कमी होते. यासाठी एलोवेराच्या पानांमधून जेल काढा आणि प्रभावित जागेवर लावा. आतून आराम मिळावा यासाठी एलोवेरा ज्यूसचं सेवन करू शकता.

हळदीची पाने

हळदीच्या पानांमध्ये अ‍ॅंटी इंफ्लामेटरी गुण असतात. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असलेली हळदीची पाने सूज कमी करू शकतात. सोबतच याने पचनक्रियाही वाढते. यासाठी ताजी हळदीची पाने बारीक करा आणि ही पेस्ट बाहेरून लावा. आतून आराम मिळण्यासाठी हळदीचा आहारात समावेश करा व हळदीच्या चहाचं सेवन करा.

आंब्याची पाने

आंब्याच्या पानांमध्येही अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात. यांच्या वापराने  वेदना आणि त्रास कमी होतो. तसेच याने पचनक्रियाही चांगली होते. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकडून घ्या. नंतर हे पाणी पार्श्वभाग स्वच्छ करण्यासाठी वापरा. आंब्याच्या पानांपासून बनलेला काढा सेवन केला तर आतून आराम मिळतो.

बेलाची पाने

बेलाच्या पानांमुळे पचनास आणि नियमित मलत्यागात मदत मिळते. यात अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि एनाल्जेसिक गुण असतात. ज्यामुळे सूज कमी होते. बेलाच्या पानांचा काढा तयार करून नियमित सेवन करा. 

मूळ्याची पाने

भरपूर फायबर असलेल्या मूळ्याच्या पानांमुळे आतड्यांचं काम चांगलं होतं. यातील अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुण पाईल्सची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. आतून आराम मिळण्यासाठी मूळा सलाद म्हणून खाऊ शकता किंवा ज्यूसचं सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य