मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST2021-05-15T04:28:09+5:302021-05-15T04:28:09+5:30

प्राप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील शिलापूर गावाला लागूनच बाघ नदी वाहते. या बाघ नदीत मासोळ्या पकडण्यासाठी अनेक लोक नदीवर जातात. ...

A young man who went fishing died of an electric shock | मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

प्राप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील शिलापूर गावाला लागूनच बाघ नदी वाहते. या बाघ नदीत मासोळ्या पकडण्यासाठी अनेक लोक नदीवर जातात. विद्युत करंटच्या साहाय्याने मासे मारण्याचे काम काही लोक करीत असल्याची परिसरात चर्चा आहे. विलास वट्टी हा युवक शुक्रवारी सकाळच्या सुमारास घरून मासे पकडण्यासाठी नदीवर गेला होता. तो दुपारी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा नदी परिसरात शोध घेतला असता तो नदीकाठी मृतावस्थेत पडून असलेला आढळला. त्याच्या अंगाचा रंग काळा पडल्याचे गावातीलच लोकांनी सांगितले. बाघ नदीवर मासे पकडण्यासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने विलास वट्टी या युवकाचा मृत्यू झाला. विलासच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, लहान भाऊ व आई, असा आप्त परिवार आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली. तपास देवरीचे ठाणेदार सिगंनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक गायधने करीत आहेत.

Web Title: A young man who went fishing died of an electric shock