शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात लंडनहून परतला एक युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाने केले क्वारंटाईन : स्वॅब नमुने पाठविले पुणे येथे तपासणीसाठी

    लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण आढळले असून संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभुमीवर ब्रिटनमधून परतणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. दहा दिवसांपूर्वी गोंदिया येथील एक रहिवासी युवक लंडनहून परतला. याची माहिती आरोग्य यंत्रणेला कळताच त्यांनी या युवकाला रुग्णालयात क्वारंटाईन करुन ठेवले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे लंडनहून गोंदिया येथे परतलेल्या युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले असून त्याच्यावर आरोग्य विभागाची नजर आहे. या युवकाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला २८ दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लंडनहून एक युवक गोंदिया येथे परतल्याची माहिती शहरात पसरातच शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आरोग्य विभागाने वेळीच पाऊल उचलले आहे.  

तो युवक येण्यापूर्वीच ते कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह इंग्लंडहून एक कोरोना पॉझिटिव्ह युवक गोंदिया येथे आला आणि तो नागपूर परतल्याची अफवा सोशल मीडियावरुन गुरुवारी जोरात पसरविण्यात आली. या संदर्भात आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता इंग्लंडहून परतलेला नागपूर येथील एक युवक आठ दिवसांपूर्वी गोंदिया येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गोंदिया येथील एका कुटुंबाकडे आला होता. मात्र हा युवक ज्या कुटुंबाकडे आला होता ते कुटुंब आधीच कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यानंतर हा युवक नागपूरला परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आला. या युवकाला गोंदिया येथून परल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या