शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

यार्डातील धान असुरक्षित

By admin | Updated: November 24, 2015 02:01 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोरगाव येथील उपबाजार नवेगावबांध येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

 नवेगावबांध : कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोरगाव येथील उपबाजार नवेगावबांध येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. परंतु येथील धानाच्या सुरक्षेची कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामात खरेदी करून ठेवलेला धान असुरक्षित झाला आहे. जे शेतकरी आपल्या गावावरून धान घेवून येतात त्यांचे धान विक्रीपूर्वीच असे सुरक्षित झाल्यामुळे बाजार समितीच्या आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. बाजार समितीकडून धान खरेदी केला जात आहे. या कामासाठी येथे दोन चौकीदार ठेवण्यात आले आहेत. ते समितीने खरेदी केलेल्या धानाची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. याच ठिकाणी वेगळ्या भागात शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर ज्या प्रमाणात धान विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत, त्यामुळे सदर धानाचे वजन वेळेवर होवू शकत नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांना मार्केट यार्डमध्येच आपले धान मोकळ्यावर सोडून घरी परतावे लागते. पण त्या धानाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीकडून ठेवलेले चौकीदार कोणत्याही स्थितीत या धानाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. अशात जर शेतकऱ्यांचे धान कमी झाले तर त्यासाठी जबाबदार कोण? धान खरेदी केंद्राच्या वतीने या धानाच्या सुरक्षेसाठी कसलीही सोय करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १६ नोव्हेंबरपासून शनिवारी २१ नोव्हेंबरपर्यंत बाजार समितीच्या यार्डात सुरू धान खरेदी केंद्रावर दोन हजार ९७३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीनंतर येथे दरदिवशी जवळपास एक हजार ५०० पोती धान पडून राहतो. या उघड्यावर ठेवलेल्या धानाच्या सुरक्षेसाठी शेतकरी चिंतित आहेत. (वार्ताहर)