शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा नगर पंचायतच्या नावाने चालणार कामकाज

By admin | Updated: October 11, 2015 01:04 IST

ओळख सालेकसाच्या नावाने, परंतु शासनाच्या रेकार्डवर आमगाव खुर्द अशा नावाने चालत असलेली ग्रामपंचायत आता सालेकसा नगर पंचायतमध्ये विसर्जित होणार आहे.

आमगाव खुर्द : ग्रामपंचायत होणार इतिहासजमाविजय मानकर सालेकसाओळख सालेकसाच्या नावाने, परंतु शासनाच्या रेकार्डवर आमगाव खुर्द अशा नावाने चालत असलेली ग्रामपंचायत आता सालेकसा नगर पंचायतमध्ये विसर्जित होणार आहे. १ आॅक्टोबरच्या निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने महाराष्ट्र शासनाला याबद्दल दिशानिर्देश दिले आहे. २०१५ च्या जनहित खटला क्र.७२ वर वादी प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उच्च न्यायालयाने शासनाला दिशानिर्देश देत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक थांबवून आधी त्यात आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याची प्रक्रिया करण्याबाबत सांगितले.१२ फेब्रुवारी २०१५ ला महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालयातील ग्राम पंचायतींना नगर पंचायत म्हणून घोषित केले. त्यानुसार सालेकसा ग्रामपंचायतलाही नगर पंचायतचा दर्जा दिला आणि येथे प्रशासक नियुक्त करण्यात आले. यादरम्यान शासनाने आमगाव खुर्द आणि सालेकसा येथील लोकांचा नगर पंचायतमध्ये समाविष्ठ करून घेण्याबद्दल अभिप्राय घेतला. परंतु आमगाव खुर्दच्या लोकांनी सतत तळ्यात-मळ्यातचा खेळ खेळणारी भूमिका घेतली होती. सुरुवातीला त्यांनी आमगाव खुर्दच्या नावाने नगर पंचायत करा अशी मागणी केली. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्या नावाने तालुका मुख्यालय चालत आहे त्याच नावाच्या ग्राम पंचायतला नगर पंचायत करा, असा आदेश असल्यामुळे त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. याचिकाकर्ता म्हणून ग्रा.पं. सदस्य ब्रजभूषणसिंह जागेश्वरसिंह बैस आणि वासुदेव महादेव चुटे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत महाराष्ट्र शासनाचे महसूल आणि नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी गोंदिया आणि राज्य निवडणूक आयोग या तिघांना प्रतिवादी बनविले.एकीकडे २८ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यात नगर पंचायतीची निवडणूक घेण्याचे आदेश् काढले. सर्वत्र निवडणुकीची अधिसुचना काढण्यात आली आणि १ आॅक्टोबर २०१५ ला नागपूर उच्च न्यायालयात न्या. बी.आर. गवई आणि न्या.प्रसन्ना वराळे यांनी खटल्यावर सुनावणी करताना सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक रद्द करून आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीमध्ये विसर्जित करण्याची प्रक्रिया करावी व त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी, असा दिशा निर्देश दिला. तत्काळ प्रभावाने निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्हाधिकारी आणि तहसीलदार सालेकसा यांना नगर पंचायत निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले. वादी प्रतिवादीकडून चर्चा उभी करताना सरकारी वकीलाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. परंतु कोर्टाने म्हटले की ही प्रक्रिया आता प्रारंभिक स्थितीत असून ती रद्द करणे परवडेल. कारण आता निवडणुका घेऊन पुन्हा आमगाव खुर्दला समाविष्ट करणे व त्यानंतर पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया करणे परवडणार नाही.आमगाव खुर्दला समाविष्ठ करण्याबाबत आमगाव खुर्द ग्राम पंचायत, सालेकसा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद गोंदिया यांचे प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.