शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा टप्पा-२ चे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

चोरखमारा व बोदलकसा तलावात पाणी सोडण्यासाठी कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पाईप टाकून ठेवण्यात आले आहेत. तर मेंढा येथील प्लांटवर पाईप बनविण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटा रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. काम बंद असल्याने त्या तशाच पडून आहेत. हे प्लांट कधी चालू होणार याची चौकशी केली असता पुढील महिन्यात सुरु होईल, असे तेथील चौकीदार आणि कामगाराने सांगितले.

ठळक मुद्देपाईप तयार करण्याचा प्लांट बंद अवस्थेत : चोरखमारा, बोदलकसा, तलावात पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतीसाठी पाणी आवश्यक आहे.धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा -१ पूर्ण झाली असून टप्पा-२ चे काम मात्र अत्यंत कासवगतीने सुरू आहे. मेंढा येथील पाईप तयार करण्याचा प्लांट कित्येक दिवसापासून बंद आहे. चोरखमारा, बोदलकसा तलावात पाणी लवकरात लवकर सोडल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळेल. तसेच पिके घेण्यास मदत होईल. परंतु कामाची स्थिती पाहून शेतकरी चिंतीत आहे.चोरखमारा व बोदलकसा तलावात पाणी सोडण्यासाठी कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पाईप टाकून ठेवण्यात आले आहेत. तर मेंढा येथील प्लांटवर पाईप बनविण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटा रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. काम बंद असल्याने त्या तशाच पडून आहेत. हे प्लांट कधी चालू होणार याची चौकशी केली असता पुढील महिन्यात सुरु होईल, असे तेथील चौकीदार आणि कामगाराने सांगितले. धापेवाडा टप्पा-२ करिता ९१७.०३ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली असून ६११.५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.बॅरेज हा ४१३ मिटर लांब, २३ दरवाजे असलेल्या ४४.०५ दलघमी (१.५६ टीएमसी) क्षमतेचे बॅरेजचे काम पूर्ण झाले. यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्हा जोडल्या गेला. कवलेवाडा पंपगृहावर ८ पंपाद्वारे पाणी उपसा करुन बोदलकसा व चोरखमारा तलावात सोडण्यात येणार आहे.बोदलकसाकरीता १९.८० कि.मी.लांबीच्या २००० मी.मी. व्यासाच्या पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. चोरखमारा तलावासाठी १९.९३ कि.मी.,१६०० मि.मी.व्यासाची पाईपची एक रांग टाकण्यात येईल.बोदलकसा पंपगृहातून ४ पंपाद्वारे पाणी उपसा करुन मंगेझरी येथील वितरण कुंडात सोडण्यात येईल.हे ५.१० कि.मी. लांबीच्या १७५० मी.मी.व्यासाच्या पाईपच्या दोन लाईन टाकण्यात येणार आहे.मंगेझरी वितरण कुंडातून डाव्या बाजूला गुमडोह, पांगडी, पिंडकेपार तलावात पाणी सोडण्यात येईल. उजव्या बाजूला कटंगी, रेंगेपार, बंदरचुहा, चुलबंद, उमरझरी, कन्हारपायली व नवेगावबांध या तलावात पाणी सोडण्यात येईल. टप्पा-२ मुळे २३४ गावांना लाभ मिळणार आहे. तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील गावांना फायदा मिळणार असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व जनप्रतिनिधी यांनी लक्ष घालून कामाला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणी