ट्रकच्या धडकेत महिला ठार

By Admin | Updated: June 19, 2014 00:09 IST2014-06-19T00:09:52+5:302014-06-19T00:09:52+5:30

भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार महिला ठार झाली. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत काचेवानी येथे ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अनिता

Woman killed in truck crash | ट्रकच्या धडकेत महिला ठार

ट्रकच्या धडकेत महिला ठार

काचेवानीजवळ अपघात : दुचाकीस्वार पती जखमी
गोंदिया : भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार महिला ठार झाली.
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत काचेवानी येथे ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अनिता अनिल हरिणखेडे (३१) असे आहे. आरोपी ट्रक चालकाने ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच ४०/४४४१ निष्काळजीपणे चालवून मोटारसायकल क्रमांक एमएच ३१/ ईएल २७३८ ला धडक दिली. यामध्ये अनिता हरिणखेडे ही ठार झाली असून अनिल हरिणखेडे (३२) व फिर्यादी कृष्णा देवाजी गौतम (२४,रा.केरेगाव, बालाघाट) हे जखमी झाले.
पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) तसेच मोटार वाहन कायदा सह कलम १८४, १३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Woman killed in truck crash