शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाला २१ वर्षांनंतर सुचले शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:54 IST

नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे.

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आरक्षित बोगीत बसण्यास मनाई : प्रवासी संतप्त, सर्वच पक्षांचा आंदोलनाचा इशारा, रेल्वेच्या दोन विभागातील वाद लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे. आरक्षीत बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गेल्या आठवडाभरापासून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. कारवाई करण्याचे शहापण रेल्वे विभागाला तब्बल २१ वर्षांनंतर कसे सुचले असा सवाल केला जात आहे. मुंबई-हावडा मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. येथून दररोज ७० ते ८० रेल्वे गाड्या धावतात. येथे बाजारपेठ व शासकीय कार्यालये असल्याने हजारो प्रवाशी दररोज रेल्वेने ये-जा करतात. गोंदियावरुन नागपूर आणि नागपूरवरुन गोंदिया असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नागपूरवरुन गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा प्रश्न मार्गी लावला.या गाडीला एकूण १९ बोगी असून सुरूवातीपासूनच आरक्षीत बोगीत जनरल तिकिटावर गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास करु दिला जातहोता. त्यामुळे प्रवाशांना सुध्दा सुविधा होत होती. विशेष म्हणजे याच गाडीत दुधवाल्यांसाठी एक स्वतंत्र बोगी देण्यात आली. गेल्या २१ वर्षांपासून गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून करित होते. पण, तब्बल२१ वर्षांनंतर मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरवरुन गोंदियाला येणाऱ्या प्रवाशांना जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई केली. मागील आठवड्यापासून प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामुळेप्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. नागपूर रेल्वे स्थानक मध्यरेल्वेमध्ये तर गोंदिया रेल्वेस्थानक दक्षिणपूर्व मध्ये रेल्वे विभागात येतो. महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदियावरुन नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई व कारवाई केली जात नाही. मात्र नागपूरवरुन येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वेच्या दोन विभागातील वादात प्रवाशांचा बळी जात असल्याचा ओरड आहे. त्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाला कारवाई करण्याचे शहापण कसे सुचले असा सवाल केला जात आहे. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करण्याची तरतूद नियमात पूर्वीपासूनच होती. मात्र त्याची अंमलबजावी आता केली जात असल्याचे सांगितले.