शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतूक कधी बंद होणार?

By admin | Updated: May 19, 2016 01:31 IST

राष्ट्रीय महामार्ग-६ वरील शिरपूर येथील सीमा तपासणी नाका वाचवून ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी ट्रक मालकांनी ककोडी-चिचगड-देवरी मार्गाचा वापर केला आहे.

देवरी : राष्ट्रीय महामार्ग-६ वरील शिरपूर येथील सीमा तपासणी नाका वाचवून ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी ट्रक मालकांनी ककोडी-चिचगड-देवरी मार्गाचा वापर केला आहे. अनेक महिन्यांपासून दररोज दिवसरात्र हा प्रकार सर्रासपणे सुरू असून रस्त्याची पूर्णच वाट लागली आहे. शिवाय अपघातांची संख्यासुद्धा वाढल्याने सदर मार्गावरून ही ओव्हरलोड वाहतूक कधी बंद होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.अवजड वाहने राष्ट्रीय महामार्ग-६ वरून न नेता देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरून नेले जात आहे. त्यामुळे कित्येकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. ही वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. परंतु ओव्हरलोड ट्रकांची सातत्याने व सर्रासपणे ये-जा सुरूच आहे. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागावे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शिरपूर येथे सीमा तपासणी नाका बनविण्यात आला आहे. तेथे प्रत्येक वाहनाचे वजन केले जाते. नियमापेक्षा अतिभार क्षमता असलेल्या वाहनांकडून दंड आकारला जातो. हा दंड वाचविण्याकरिता सुरूवातीला ट्रक मालक सिरपूर-मकरधोकडा या मार्गाचा वापर करीत असत. मात्र आता या मार्गाची दुर्दशा झाल्याने क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करून या मार्गावर बॅरिकेट्स लावण्याची मागणी केली होती. तसेच प्रशासनानेही लगेच या मार्गावर व्हाईट बेरिकेट्स लावल्याने या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे बंद झाली. यानंतर ट्रक चालकांनी ओव्हरलोड वाहनांकरिता ककोडी-चिचगड-देवरी या मार्गाचा वापर सुरू केला. आता या मार्गावर दिवसरात्र पोलिसांच्या सहकार्याने शेकडो ट्रक ये-जा करतात. त्यामुळे संपूर्ण मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सामान्य रहदारीचा हा मार्ग आता धोकादायक झालेला आहे. कित्येकांना या मार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अनेकदा ही ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे.परंतु मागील सहा-सात महिन्यांपासून ओव्हरलोड वाहतूक पोलिसांच्या मदतीने सर्रासपणे सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेने न्याय कुणाकडे मागावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. आता या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक बंद होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)